शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत गैरप्रकार होताय, अ‍ॅपवर तक्रार करा!

By admin | Updated: January 24, 2017 15:57 IST

निवडणूक आयोगाचे अ‍ॅप : गुन्हेगार उमेदवारांची करणार ‘जाहिरात’

निवडणुकीत गैरप्रकार होताय, अ‍ॅपवर तक्रार करा! 

निवडणूक आयोगाचे अ‍ॅप : गुन्हेगार उमेदवारांची करणार ‘जाहिरात’

संजय पाठक / नाशिक : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये गैरप्रकार होत असेल आणि त्याबाबत माहिती देता येत नसेल तर ती तातडीने देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने खास अ‍ॅप तयार केले असून त्यावर माहिती टाकल्यास तत्काळ त्याची दखल घेतली जाणार आहे. याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची संक्षिप्त ‘कामगिरी’ वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्यात एकाच वेळी दहा महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुका म्हटल्या की, बाहुबली उमेदवार, पूर्ववैमनस्य आणि राजकीय वाद होतातच, परंतु मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मतदान केंद्रे ताब्यात घेणे, तोतया मतदार उभे करणे असे अनेक प्रकार होत राहतात. अनेकदा तेथे यंत्रणा अपुरी पडते किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सिटीझन आॅन पेट्रोल हे अ‍ॅप तयार केले असून त्यावर सर्वसामान्य नागरिकही थेट माहिती दिली जाईल, अशाप्रकारची माहिती अ‍ॅपवर दिल्यानंतर तातडीने मतदार केंद्राच्या परिसरातील सर्व यंत्रणांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि यंत्रणा कृती करेल. त्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकार टळण्यास मदत होणार आहे. याशिवाय यंदाच्या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांविषयी मतदारापर्यंत माहिती पोहोचावी यासाठीदेखील विशेष काळजी घेण्यात येणार आहे. अशा गुन्हेगारांची कर्तबारगारी वृत्तपत्रातून संक्षिप्तरीत्या प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील कोणत्या उमेदवाराला मतदान करावे याचा निर्णय मतदाराला घेता येईल. सामान्यत: निवडणूक अर्ज दाखल करताना उमेदवारांना त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात द्यावी लागते. परंतु ही सर्वच माहिती नागरिकांनापर्यंत पोहोचेल असे नाही, त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने यंदा काळजी घेतली आहे.