शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

गैरप्रकारांची तक्रार करा कॉॅपवर

By admin | Updated: January 24, 2017 01:07 IST

निवडणूक आयोगाचे कॉप : गुन्हेगार उमेदवारांची करणार ‘जाहिरात’

 नाशिक : राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये गैरप्रकार होत असेल आणि त्याबाबत माहिती देता  येत नसेल तर ती तातडीने देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने खास  अ‍ॅप तयार केले असून, त्यावर  माहिती टाकल्यास तत्काळ त्याची दखल घेतली जाणार आहे. याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांची संक्षिप्त ‘कामगिरी’ वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जाणार आहे.राज्यात एकाच वेळी दहा महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. निवडणुका म्हटल्या की, बाहुबली उमेदवार, पूर्ववैमनस्य आणि राजकीय वाद होतातच, परंतु मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मतदान केंद्रे ताब्यात घेणे, तोतया मतदार उभे करणे, असे अनेक प्रकार होत राहतात.  अनेकदा तेथे यंत्रणा अपुरी पडते किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सिटीझन  आॅन पेट्रोल हे अ‍ॅप तयार केले  असून त्यावर सर्वसामान्य नागरिकही थेट माहिती दिली जाईल, अशाप्रकारची माहिती अ‍ॅपवर दिल्यानंतर तातडीने मतदार केंद्राच्या परिसरातील सर्व यंत्रणांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि यंत्रणा  कृती करेल. त्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकार टळण्यास मदत होणार आहे.  याशिवाय यंदाच्या निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांविषयी मतदारापर्यंत माहिती पोहोचावी यासाठीदेखील विशेष काळजी घेण्यात येणार आहे. अशा गुन्हेगारांची कर्तबारगारी वृत्तपत्रातून संक्षिप्तरीत्या प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील कोणत्या उमेदवाराला मतदान करावे याचा निर्णय मतदाराला घेता येईल.  सामान्यत: निवडणूक अर्ज दाखल करताना उमेदवारांना त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात द्यावी लागते. परंतु ही सर्वच माहिती नागरिकांनापर्यंत पोहोचेल असे नाही, त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने यंदा काळजी घेतली आहे.