शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

जिल्हा प्रशासनाच्या प्रत्युत्तराने मनपा गोंधळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:43 IST

स्थायी समितीच्या एका जागेसाठी निवडणूक घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे नगरसचिवांनी परवानगी मागितली खरी; परंतु त्याला अत्यंत तांत्रिक भाषेत जिल्हा प्रशासनाने उत्तर दिले असून,

नाशिक : स्थायी समितीच्या एका जागेसाठी निवडणूक घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे नगरसचिवांनी परवानगी मागितली खरी; परंतु त्याला अत्यंत तांत्रिक भाषेत जिल्हा प्रशासनाने उत्तर दिले असून, त्यांचे नक्की म्हणणे समजावून घेण्यासाठी आता पुन्हा याच अधिकाऱ्यांना प्रशासनाचे अधिकारी भेटणार आहेत.महापालिकेतील सत्तारूढ भाजपाच्या एका नगरसेवकाचा मृत्यू झाल्याने त्यांचे पक्षीय तौलनिक बळ काहीसे घटले असून, अपूर्णांकातील तौलनिक बळाचा फायदा घेऊन स्थायी समितीच्या सदस्यपदी शिवसेनेचा एक सदस्य वाढवावा अशी या विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि शिवसेना गटनेता विलास शिंदे यांची मागणी होती. स्थायी समितीत भाजपाचे पाच सदस्य जात असताना वादामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चार सदस्यांची यंदा नियुक्ती करण्यात आली आहे. एका जागेचा तिढा सोडविताना विभागीय आयुक्तांनी पक्षीय तौलनिक बळाचे अधिकार महासभेचेच असतात असे नमूद करतानाच शिंदे यांच्या अर्जावर विभागीय आयुक्तांनी महापालिकेलाच निर्णय घेण्यास सांगितले. त्यावर वकिलांचा सल्ला घेऊन या जागेवर भाजपाचाच एक सदस्य नियुक्त करण्यासाठी विशेष महासभा बोलविण्याचे ठरविले होते.पुन्हा न्यायालयात वादविभागीय आयुक्तांचा निर्णय शिवसेनेला अनुकूल नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात पुन्हा दाद मागण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याचे वृत्त आहे. तथापि, लोकसभा निवडणुका असल्याने त्यावर वादाचे पडसाद उमटू नये यासाठी सेनेचे पदाधिकारी या विषयावर आक्रमक झाले नसल्याचे सांगण्यात आले.सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असून, त्यामुळेच महासभा घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागणारे पत्र नगरसचिवांनी गेल्या आठवड्यात सादर केले होते. त्यावर जिल्हा प्रशासनाने सध्या आचारसंहिता सुरू असल्याने आचारसंहितेच्या कलम २७ नुसार निर्णय घ्यावा असे कळविले. स्पष्टता नाहीच; परंतु कलम २७ देखील गोंधळात टाकणारे असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे नक्की अर्थबोध होत नसल्याने महासभा बोलवावी किंवा नाही अशा पेचात नगरसचिव सापडले आहेत.तथापि, या पत्राचे स्पष्टीकरण समजावून घेण्यासाठी बुधवारी (दि. २७) ते जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जाणार आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय