शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन बदलीप्रक्रियेतील गैरप्रकार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:48 IST

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पेहरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक २०१७ पासून अनधिकृतरीत्या गैरहजर असताना २०१८मध्ये झालेल्या जिल्हाअंतर्गत आॅनलाइन बदलीप्रक्रियेत अधिकाराचा गैरवापर करून गैरहजर शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीस मान्यता देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशाप्रकारे नियम डावलून बदलीस मान्यता देणाºया तत्कालीन गटशिक्षण अधिकारी व मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी शनिवारी (दि. ५) दिले आहेत.

ठळक मुद्देपदाचा गैरवापर : मुख्याध्यापक, गटशिक्षण अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पेहरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक २०१७ पासून अनधिकृतरीत्या गैरहजर असताना २०१८मध्ये झालेल्या जिल्हाअंतर्गत आॅनलाइन बदलीप्रक्रियेत अधिकाराचा गैरवापर करून गैरहजर शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीस मान्यता देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशाप्रकारे नियम डावलून बदलीस मान्यता देणाºया तत्कालीन गटशिक्षण अधिकारी व मुख्याध्यापकावर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी शनिवारी (दि. ५) दिले आहेत.इगतपुरीतील पेहरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बापू भिवसन पाटील हे शिक्षक मार्च २०१७ पासून ते अनधिकृतपणे गैरहजर असल्याने त्यांच्या विरोधात खातेचौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. बापू पाटील अनधिकृतपणे गैरहजर असल्याचा अहवाल गटशिक्षण अधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक यांनीच सादर केला होता. असे असतानाही २०१८ मध्ये झालेल्या जिल्हांतर्गत बदलीप्रक्रियेत सदर शिक्षकाने पेहरेवाडी येथून विनंती बदलीबाबत आॅनलाइन माहिती भरून बदलीसाठी अर्ज केला होता. त्यांना मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांनी मान्यताही दिली.  त्यामुळे संबंधित शिक्षकाची कळवण तालुक्यातील आठंबे येथे बदली झाली. याप्रकरणी इगतपुरी तालुक्यातील तत्कालीन गटशिक्षण अधिकारी व मुख्याध्यापक यांनी पदाचा गैरवापर केल्याचे आढळून आल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिक री डॉ. नरेश गिते यांनी संबंधित मुख्याध्यापक व गटशिक्षण अधिकारी यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.