शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यातील मुद्रांक घोटाळ्याचे विधानसभेत पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 01:21 IST

देवळा येथील मुद्रांक घोटाळ्यासह नाशिक येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून गहाळ झालेल्या अभिलेखाबद्दलचे पडसाद शुक्रवारी (दि.५) विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटल्याने या प्रकरणातील तपास कार्याला अधिक गति येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

ठळक मुद्देतपासाला गती मिळण्याची शक्यता; चौकशीत बनावट मुद्रांकांचा वापर उघड

देवळा : देवळा येथील मुद्रांक घोटाळ्यासह नाशिक येथील दुय्यम निबंधक कार्यालयातून गहाळ झालेल्या अभिलेखाबद्दलचे पडसाद शुक्रवारी (दि.५) विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटल्याने या प्रकरणातील तपास कार्याला अधिक गति येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  दुय्यम निबंधक श्रेणी-१, कार्यालय देवळा येथे एकाच क्रमांकाचे दोन मुद्रांक वापरुन बनावट खरेदीखत तयार करण्यात आल्याचे प्रकरण राज्यभर गाजत असून शुक्रवारी विधानसभेतही त्यावर चर्चा झाली.  महिनाभरापूर्वी सदरचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याचा तपास करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक  विभागाने देवळा येथे दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशीसाठी त्रिसदस्यीय पथक पाठविले होते.  पथकाने केलेल्या चौकशीत कार्यालयीन अभिलेखात बनावट दस्तऐवज समाविष्ट करुन त्याची प्रमाणित प्रत दुय्यम निबंधक श्रेणी-१,देवळा या कार्यालया मार्फत देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तपास सुरळीत व्हावा यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी देवळा येथील तत्कालिन दुय्यम निबंधक प्रकाश गांगोडे यांचा पदभार काढून घेण्याची कार्यवाही करून माधव महाले यांच्याकडे दुय्यम निबंधकपदाचा पदभार सोपविला होता. दवंगे यांनी महाले यांना सदर प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. शासनाच्यावतीने महाले यांनी देवळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर त्यांच्याकडून पदभार काढून घेत स्वप्निल बिरकुरवार यांच्याकडे सध्या दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.  देवळा तालुक्यातील बनावट मुद्रांक प्रकरणातील फरार संशयित चंद्रकांत ऊर्फ गोटु वाघ ह्या मुद्रांक विक्रेत्याचा परवाना निलंबित करण्याची कारवाई नोंदणी व मुद्रांक विभागाने केली असून त्याच्याकडील मुद्रांक साठा,नोंदवह्या व मूळ परवाना जप्त करण्यात आले आहेत. दि.१३ फेब्रुवारी रोजी मुद्रांक विक्रेता चंद्रकांत देवाजी वाघ व इतर याचेवर देवळा पोलीस ठाण्यात भारतीय नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून चंद्रकांत वाघ हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नोंदलेल्या दस्तावेजांबाबत चिंता आपले महत्वाचे दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात सुरक्षित नसल्याची बाब समोर आल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, मुद्रांक घोटाळ्यातील प्रमुख संशयित अद्यापही पोलिसांच्या हाती लागत नसल्याने तपास कार्याबाबतही शंका उपस्थित होत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकScam 1992स्कॅम १९९२Politicsराजकारण