शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दारणाचे आवर्तन, प्रशासनाचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:26 IST

सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. इंटेक वेलपर्यंत पात्रातील पाणी विद्युतजलपंप टाकून जमा करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीही दारणा धरणातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर जिल्हा प्रशासनाने मौन धरल्याने सिन्नर शहरासह तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाºयावर यंत्रणेवर कमालीचा ताण पडणार आहे.

ठळक मुद्देपाणीसाठा संपुष्टात : सिन्नर शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे भीषण संकट

सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. इंटेक वेलपर्यंत पात्रातील पाणी विद्युतजलपंप टाकून जमा करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीही दारणा धरणातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर जिल्हा प्रशासनाने मौन धरल्याने सिन्नर शहरासह तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाºयावर यंत्रणेवर कमालीचा ताण पडणार आहे. येत्या आठ दिवसात दारणा नदीपात्रात पाण्याचे आर्वतन न सुटल्यास कधी नव्हे एवढ्या पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ सिन्नरकरांसह टॅँकरने पाणीपुरवठा होणाºया गावांवर येणार आहे.सिन्नर शहरास दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातून पाणीपुरवठा होत असतो. मात्र गेल्या आठ दिवसांपासून नदीपात्र कोरडे पडल्याने इंटेक विहिरीत पाणी येत नाही. त्यामुळे नदीपात्रात खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी विद्युत जलपंप टाकून ते एका मोठ्या खड्ड्यात जमा करून त्याचा उपसा करण्याची वेळ नगर परिषदेवर आली आहे. जवळच्या खड्ड्यातील पाणी एकत्र करून उपसा करत जास्तीत जास्त सात दिवस पाणी पुरेल इतकेच पाणी नदीपात्रात आहे. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प होणार आहे. जी अवस्था नगर परिषदेची आहे तीच अवस्था एमआयडीसी निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रावर टंचाईचे मोठे सावट निर्माण झाले आहे. दारणा नदीपात्रातून सिन्नर नगर परिषदेसह एमआयडीसी, भगूर नगर परिषद, देवळाली कॅम्प व नाशिकरोडच्या काही भागाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या पाचही जणांनी दारणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पाणीसाठा लवकर संपल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. नियोजित आवर्तन मे महिन्यात असताना एप्रिलमध्येच पाणी संपल्याने अवैध पाणी उपशाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला.सिन्नर शहराला केवळ सात दिवस पाणी पुरेल इतके पाणी कसेबसे उपलब्ध केले जात आहे. आवर्तन न सुटल्यास टंचाई वाढणार आहे. खासगी टॅँकरचालकांची बैठक घेऊन कोणत्या विहिरींतून पाणी उपलब्ध करून घेता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. दारणा धरणातच कमी साठा असल्याने आवर्तन सुटत नाही तोपर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहन आहे. सिन्नरकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासह सहकार्य करावे.-व्यंकटेश दूर्वास, मुख्याधिकारी, सिन्नर