शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गायकवाड सभागृहामागील रस्त्याची दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:16 IST

---- कॉलेजरोडवर पुन्हा ‘रायडिंग’ची धूम नाशिक : शहरातील कॉलेजरोड भागात पुन्हा ‘रायडिंग’ करणाऱ्या स्पोर्ट्स‌ बाईकर्सकडून रॅश ड्रायव्हिंग केली जात ...

----

कॉलेजरोडवर पुन्हा ‘रायडिंग’ची धूम

नाशिक : शहरातील कॉलेजरोड भागात पुन्हा ‘रायडिंग’ करणाऱ्या स्पोर्ट्स‌ बाईकर्सकडून रॅश ड्रायव्हिंग केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. महाविद्यालये खुली होताच रायडिंग करणाऱ्या दुचाकीस्वारांचे पेव फुटले आहे. शहर वाहतूक पोलिसांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

----

सावता माळी रस्ता ‘टी-पाॅईंट’वर वाहनांचा गोंधळ

वडाळागाव : रविशंकर मार्गावरील चौफुलीवर वाहतुकीचा गोंधळ निर्माण होऊ लागल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. संत सावता माळी कॅनॉल रोड टी-पाॅईंट तसेच वडाळागावात जाणाऱ्या रविशंकर मार्गावरील चौकात वाहनचालकांचा गोंधळ उडून अपघात घडत आहेत. या चौकामध्ये दोन्ही बाजूंनी वाहने भरधाव वेगाने येतात, त्यामुळे वळण घेणाऱ्या वाहनांची धडक होऊन अपघात घडत आहेत.

-----

वडाळा चाैफुलीजवळ वाहनांची अनधिकृत पार्किंग

वडाळागाव : वडाळा चौफुलीजवळील वडाळा रस्त्यावर गुलशन-ए-अमीन कॉलनीसमोर रस्त्याकडे दिवस-रात्र अनधिकृतपणे ट्रक एकापाठोपाठ उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच गोठ्याजवळसुद्धा रात्रीच्या सुमारास मालवाहू ट्रकची पार्किंग केली जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

----

भंगारमालामुळे वाहतुकीला अडथळा

वडाळागाव : वडाळारोडवरील मुख्य रस्त्यावर असलेल्या चांदशावली बाबा दर्गाजवळ भंगार मालाच्या खरेदी-विक्रीच्या दुकानाचे अतिक्रमण वाढीस लागत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. येथून रस्ता अरुंद असून रस्त्यालगतच भंगार मालची साठवणूक होत असल्याने रहदारीला अडथळा येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

----

वडाळागावात डासांचा वाढता उपद्रव

वडाळागाव : परिसरात मागील काही दिवसापासून डासांचा उपद्रव वाढल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या दोन महिन्यापासून गावात डास प्रतिबंधात्मक धूर किंवा औषध फवारणी करण्यात आली नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मनपाच्या हिवताप नियंत्रण विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

----

वडाळा बाजारात मास्कच्या वापराकडे दुर्लक्ष

वडाळागाव : येथील रजा चौक, जय मल्हार कॉलनीमध्ये भरणाऱ्या दररोजच्या ‘मिनी मार्केट’मध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व नियमाचा पूर्णत: फज्जा उडत असल्याचे चित्र आहे. महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून या बाजारात भेट देत कारवाई करण्याची मागणी होत आहे. बाजारातील विक्रेत्यांसह ग्राहकांपर्यंत कुणीही मास्कचा वापर तसेच सामाजिक सुरक्षित अंतर राखत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे वडाळागावात पुन्हा कोरोनाचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

---