नाशिक : पालिका बाजारातील करारनाम्याची मुदत संपुष्टात आलेल्या १२८७ गाळ्यांसाठी लिलावप्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावतानाच संबंधित गाळेधारकांना प्रचलित बाजारमूल्यानुसार (रेडीरेकनर) भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला. संबंधिताना तीनऐवजी पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय थकबाकीदारांचे गाळे सील करण्याची कारवाई करतानाच पोटभाडेकरूंची तपासणी करून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचेही आदेश स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी दिले.महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांचा जाहीर लिलाव करून त्यांना प्रचलित बाजारमूल्यानुसार भाडे आकारणीचा आणि १५ वर्षांच्या कालावधीसाठी गाळे देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीवर पाच महिन्यांपूर्वीच ठेवला होता.
पालिकेच्या गाळ्यांना बाजारमूल्यानुसार भाडे
By admin | Updated: June 25, 2015 00:20 IST