पंचवटी : श्री स्वामिनारायण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी ‘रेनी डे’ साजरा केला. रंगीबेरंगी रेनकोट व छत्र्या घेऊन विविध गाण्यांवर थिरकत पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांनी लुटला. मुख्याध्यापक अस्मिता पटेल, मुख्य संचालक माधव प्रकाश स्वामी, ज्ञानपुराणी स्वामी, माँटेसरी विभागाच्या प्रमुख अनिता डापसे तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. (वार्ताहर)
स्वामिनारायण स्कूलमध्ये रेनी डे
By admin | Updated: July 19, 2014 00:56 IST