शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कुरापत काढून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST

दीपक विजयप्रकाश मिश्रा (२४, रा. सह्याद्रीनगर) हा त्याचा मित्र वैभव शिंगाडे, अक्षय पाटीलसोबत विल्होळी येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला ...

दीपक विजयप्रकाश मिश्रा (२४, रा. सह्याद्रीनगर) हा त्याचा मित्र वैभव शिंगाडे, अक्षय पाटीलसोबत विल्होळी येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता. त्यावेळी दीपक याने शिंगाडे यास जास्त मद्य पिऊ नको, असे सांगितले असता त्याचा त्याला रा. आल्याने त्याने दीपक यांचा जेवणाचा टेबल भिरकावून दिला. यावरून दीपक व त्याचे मित्र हॉटेल सोडून माघारी परतले. मात्र दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान संभाजी स्टेडियम येथे दीपक फेरफटका मारत असताना संशयित वैभव, अक्षय व त्याच्या साथीदारांनी भांडणाची कुरापत काढून दीपकला लाकडी बॅट व स्टम्पने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

नाशिक : पंचवटीतील पेठराेडवर भरधाव ट्रक चालविणाऱ्या चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रकची दुचाकीला धडक बसली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकचालक बबलू विश्राम पवार (रा.जि. मंडूसर, मध्यप्रदेश) हा त्याचा ट्रक (एमएच 46 बीएफ ३६२५) पेठरोडकडून भरधाव चालवीत होता. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला (एमएच १५ सीवाय ७६५६) त्याने धडक दिली. दुचाकीचालक रमेश संजय गावित (रा. मु. अंबाने, ता. दिंडोरी) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------

विषारी औषध पिऊन आत्महत्या

नाशिक : तिडके कॉलनीत एकाने घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. किसन नामदेव साळुंके (५५, रा. नेहवर्धिनी सोसायटी, तिडके कॉलनी, नाशिक) असे मृताचे नाव असून आत्महत्येचे कारण समजलेले नाही.

साळुंके यांनी विषारी औषध सेवन केल्यावर त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.