खर्डे (वार्ताहर ) येथे गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत लोकसहभागातून तीन पाझर तलावातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याचे काम सुरू आहे . ,लोकसहभागातून जवळपास तीन पाझर तलावातून गाळ उपसा करण्याचे काम सुरू झाले असून ,याकामाला चांगला प्रतिसाद मिळत आहे . टाटा ट्रस्ट व युवा मित्र ,सिन्नर आ िणमहाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत येथील लांबी कार ,ब्राह्मण आंबा व धोडी या तीन पाझर तलावातील गाळ लोकसहभागातून उपसण्यात आला . या उपक्र माला गावातील शेतकर्यांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे . एकेकाळी पाण्याचे माहेर घर असलेल्या या परिसरात दुष्काळ पडला असून , हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे . मुलूकवाडी येथील विहीर अधिग्रहित करून गावाला चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे .खर्डे परिसराला लाभदायक ठरणारे वार्शी धरणातील पाणी उन्हाळ्याच्या सुरु वातीलाच कमी झाल्याने विहिरींनी तळ गाठला . परिणामी परिसरातील शेतकर्यांचे पाण्याअभावी कांदा पीक वाया गेल्याने आर्थिक संकट उभे राहिले आहे . पाण्याअभावी हा परिसर ओसाड झाला असून , शेतकरी वर्ग मोटाकुटीस आला आहे . भविष्यात उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी येथील शेतकर्यांनी गाळ मुक्त धरण ,गाळ युक्त शिवार योजनेला लोकसहभागातून चांगला प्रतिसाद दाखिवल्याने या तीनही पाझर तलावातून मोठ्या प्रमाणावर गाळ उपसा झाला आहे . जून मिहना अर्धा होत आला तरी अध्याप पाऊस पडत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत असून , पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेपुढे आर्थिक संकट उभे ठाकले आहे . समाधान कारक पाऊस झाल्यास या गाळ मुक्त अभियानाचा निश्चितच फायदा होईल . यात शंका नाही .फोटो ओळ - खर्डे येथे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेतून धोडी पाझर तलावातून लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर गाळ उपसण्याचे सुरू असलेले काम .(14 खर्डे धरण)
तीन पाझर तलावातून गाळ काढण्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 16:32 IST
खर्डे :येथे गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत लोकसहभागातून तीन पाझर तलावातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याचे काम सुरू आहे . ,लोकसहभागातून जवळपास तीन पाझर तलावातून गाळ उपसा करण्याचे काम सुरू झाले असून ,याकामाला चांगला प्रतिसाद मिळत आहे . टाटा ट्रस्ट व युवा मित्र ,सिन्नर आ िणमहाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार अभियानातंर्गत येथील लांबी कार ,ब्राह्मण आंबा व धोडी या तीन पाझर तलावातील गाळ लोकसहभागातून उपसण्यात आला .
तीन पाझर तलावातून गाळ काढण्याचे काम
ठळक मुद्दे गाळमुक्त धरण ,गाळयुक्त शिवार अभियान