शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

धरणातून गाळ हटविल्यास टळेल महापुराचा धोका

By admin | Updated: May 16, 2017 23:43 IST

पर्याय : गोदाप्रेमी समितीने दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या महापुराचा धोका टाळण्यासाठी गंगापूर धरण आणि गोदापात्रातील गाळ काढण्याची सूचना गोदाप्रेमी नागरी सेवा समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. गाळ काढल्यास जलसाठवण क्षमता वाढून पुराचा धोका टळू शकेल, असे निवेदनात म्हटले आहे.गेल्या वर्षी ३ आॅगस्टला गंगापूर धरणातून गोदापात्रात ४२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु त्याचवेळी अहल्यादेवी होळकर पुलाखाली ७५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. म्हणजेच ३२ हजार ५०० क्यूसेक अतिरिक्त पाणी गोदापात्रात होते. त्यात भर म्हणून गटारींचे पाणी मिसळत होते. अहल्यादेवी होळकर पुलाच्या पुढेदेखील पुराची स्थिती गंभीर होते. सध्या शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना राबवण्याचे ठरविले आहे. त्या पार्श्वभूमीवर गंगापूर धरणातून गाळ काढल्यास साठवण क्षमता वाढेल, तसेच पुराची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आनंदवली ते होळकर पुलाखालीदेखील गाळ साचला असून, तो हटविल्यास साठवण क्षमता वाढण्याबरोबरच ग्राऊंड वॉटर रिचार्ज प्रक्रियेला चालना मिळेल, असे देवांग जानी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय पावसाळी गटार योजनेचे पाणी थेट नदीपात्रात मिसळते आणि त्यामुळे नदीला पूर येतो. हे टाळण्यासाठी पावसाळी गटारींचे पाणी शोषखड्डे करून जमिनीत मुरवले तर भूगर्भातील जलपातळी वाढण्यास मदत होईल, त्यासाठी गोदाप्रेमी नागरी सेवा समिती आणि मविप्र वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राजक्ता बस्ते विनामोबदला सहकार्य करण्यास तयार असल्याचे जानी यांनी म्हटले आहे.