शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरपर्यंत दावे निकाली काढा

By admin | Updated: August 19, 2016 01:14 IST

वनहक्क : सात हजार दावे पाच वर्षांपासून प्रलंबित

नाशिक : गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा समिती व उपविभागीय समितीदरम्यान प्रवास करणारे वनहक्काचे दावे येत्या डिसेंबरपर्यंत निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकारी, वन व आदिवासी खात्याच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. ही बैठक घेण्यामागे येत्या महिनाभरात राज्याचे राज्यपाल नाशिक दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या दृष्टीने वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीला प्राधान्य आहे. राज्यपाल माहिती घेतील, म्हणून त्याची पूर्वतयारी करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात उपविभागीय स्तरावर पडून असलेल्या दावांची माहिती जाणून घेण्यात आली व दावे मंजूर करण्यामागे येणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. अनेक आदिवासींकडे अतिक्रमणाचे पुरावे नसल्यामुळे तालुकास्तरीय व उपविभागीय स्तरावर दावे मंजूर केले जात नसल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर वेळोवेळी दाव्यांची सत्यता पडताळून पाहिल्यावरही पुन्हा पुन्हा चौकशीसाठी दावे पाठविले जात असल्याची बाबही चर्चिली गेली. ज्या ज्या पातळीवर दावे प्रलंबित असतील ते तत्काळ निकाली काढण्यात यावे व डिसेंबरपर्यंत काम संपवावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. सन २०११ पासून ७९९१ इतके दावे कोणत्याही निर्णयाविना पडून आहेत.

दावे मंजूर करण्याचे अधिकार महसूल अधिकाऱ्यांना असल्यामुळे त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता असल्यास निर्णय घेऊन मोकळे व्हावे, असेही सांगण्यात आले तर मोजणी करणाऱ्या भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर असलेले क्षेत्र तसेच कब्जेदार आदिवासीच्या ताब्यात असलेले क्षेत्र अशा दोहोंची मोजणी करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. या बैठकीसाठी आग्रही असलेले राज्याचे सल्लागार अरुण सोनार मात्र स्वत:च गैरहजर राहिले तर अन्य खात्यांच्या सर्वच अधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली होती.