शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाणगंगाकाठच्या गावांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:25 IST

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बाणगंगा काठच्या सात गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाने गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पिण्याचा पाण्यासाठी आवर्तन सोडले आहे. जनतेची मागणी लक्षात घेऊन बाणगंगेला पाणी सोडल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत असले तरी शेतीसाठी आवर्तन न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.

ठळक मुद्देगंगापूर धरणातून आवर्तन : शेतकऱ्यांमध्ये मात्र तीव्र नाराजी

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बाणगंगा काठच्या सात गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाने गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पिण्याचा पाण्यासाठी आवर्तन सोडले आहे. जनतेची मागणी लक्षात घेऊन बाणगंगेला पाणी सोडल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत असले तरी शेतीसाठी आवर्तन न दिल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.बाणगंगा काठावरील दीक्षी, दात्याणे, जिव्हाळे, ओणे, थेरगाव, कसबे सुकेणे व मौजे सुकेणे या सर्व गावांचा पाणीपुरवठा हा बाणगंगेच्या काठावर असलेल्या विहिरींवर आधारित आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बाणगंगा कोरडीठाक पडल्याने बाणगंगा काठच्या सात गावांतील शेती, जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. द्राक्षबागा, फूलशेती कोमजली असून, जनावरांचेही पाण्यासाठी हाल होत आहे.पाण्यासाठी नागरिक दररोज भटकंती करीत आहे. टंचाईची गंभीर परिस्थितीची पाहणी करून आमदार अनिल कदम यांनी कसबे सुकेणे येथे गेल्या आठवड्यात तातडीची बैठक घेतली होती. त्यानंतर प्रशासनाकडेही पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार रविवारपासून (दि.२) गंगापूर धरणातून डाव्या कालव्यातून बाणगंगेला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.सोमवारी दुपारपर्यंत पाणी दात्याने बंधाºयापर्यंत पोहचले होते. बाणगंगेवरील सर्व बंधारे भरली जाणार असल्याने बाणगंगा काठाच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. गंगापूर धरणातून डाव्या कालव्याला १७५ क्यूसेक पाणी सोडण्यात आले असून, बाणगंगा काठावरील गावांना पिण्यासाठी बाणगंगेत ७० क्यूसेक, तर १६ नंबर चारीला २५ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, बुधवारी (दि.५) सकाळी मौजे व कसबे-सुकेणेला पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त ठरणारे दोन्हीही बंधारे भरल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मौजे सुकेणेचे विलास गडाख यांनी सपत्निक बाणगंगेचे पाणी पूजन केले.