शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याचे दर उतरल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:11 IST

नाशिक : पावसाळ्यापूर्वी विविध मार्गांवर असलेल्या धोकादायक झाडांची छाटणी करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. वादळी वाऱ्यात अनेक ...

नाशिक : पावसाळ्यापूर्वी विविध मार्गांवर असलेल्या धोकादायक झाडांची छाटणी करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. वादळी वाऱ्यात अनेक झाडे कोसळण्याच्या घटना घडत असतात, यामुळे नुकसान होते. पावसाळ्यापूर्वी या झाडांची छाटणी करणे आवश्यक असल्याने, या कामाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.

कारागिरांना मदत करण्याची मागणी

नाशिक : लॉकडाऊनमुळे वाहन दुरुस्तीची गॅरेज बंद असल्यामुळे येथील कारागिरांना रोजगार मिळणे मुश्कील झाले आहे. यामुळे त्यांना अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीचे काही दिवस मालकांनी त्यांना पगार दिला. पण, त्यांनाही आता ते शक्य होत नसल्याने, या कारागिरांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.

परप्रांतीय कारागिरांमुळे कामे रखडली

नाशिक : लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय कारागीर आपापल्या गावी गेल्यामुळे अनेक बांधकामांवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. काहींनी बांधकाम करण्याचा निर्णय काहीकाळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी स्थानिक मजुरांमार्फत कामे केली जात आहेत.

बंदमुळे हॉटेलकडून मागणी घटली

नाशिक : शहरातील अनेक हॉटेल्स बंद असल्यामुळ हॉटेलांना भाजीपाला पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. जे हॉटेल पार्सल सेवा पुरवित आहेत, त्यांना मागणी कमी असल्यामुळे त्यांच्याकडून भाजीपाला मर्यादित स्वरूपात खरेदी केला जात असल्याने, शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

द्वारका चौकात पुन्हा वाहतूककोंडी

नाशिक : उड्डाणपूल जोडणीच्या कामामुळे उड्डाण पुलावरून जाणारी वाहतूक बंद करण्यात आल्याने द्वारका चौकात पुन्हा अवजड वाहनांची वर्दळ वाढली असून, वाहतूककोंडी होऊ लागली आहे. उड्डाणपूल जोडणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.