शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधून येणाऱ्या साईभक्तांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:25 IST

सायखेडा : गुजरात राज्यातून महाराष्टÑातील शिर्डी, शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी महत्त्वपूर्ण असणारा सुरत-शिर्डी महामार्गावरील सायखेडा ते भेंडाळी रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, या रस्त्यामुळे भाविकांचा प्रवास जलद होऊ शकणार आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये समाधान : सायखेडा ते भेंडाळी रस्त्याचे काम प्रगतिपथावर

सायखेडा : गुजरात राज्यातून महाराष्टÑातील शिर्डी, शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येणाºया भाविकांसाठी महत्त्वपूर्ण असणारा सुरत-शिर्डी महामार्गावरील सायखेडा ते भेंडाळी रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, या रस्त्यामुळे भाविकांचा प्रवास जलद होऊ शकणार आहे.गोदाकाठची मुख्य बाजारपेठ असणाºया सायखेड्यापासून जवळपास असणाºया सर्व छोट्या खेड्यांत जाणारे रस्ते वर्दळीचे आहेत. सायखेड्यापासून पूर्वेला असणारी अनेक छोटी खेडी आणि गुजरात राज्यातून शिर्डीकडे जाणारे सर्व भाविकांचा रहदारीचा असणारा सुरत ते शिर्डी महामार्ग सायखेडापासून भेंडाळीपर्यंत खराब झाला होता. रस्त्यावर अनेक छोटे-मोठे खड्डे पडले होते. रस्त्याचे काम व्हावे, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती.सिन्नर, कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांतील रहिवासी नाशिकला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. गोदाकाठ भागातील शेतमाल नाशिक, पिंपळगाव, सायखेडा, ओझर या बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. गोदाकाठ भागातील पूर्वेकडील अनेक गावांमधील ग्रामस्थ सायखेडा येथे सातत्याने येतात, ते याच मार्गाचा वापर करतात. गुजरात राज्यातून येणारे अनेक भाविक या रस्त्याचा वापर करतात. जवळचा आणि नाशिक, सिन्नर या शहरातून जावे लागत नसल्याने हा पर्यायी रस्ता वापरला जातो. ओझर ते सायखेड्यापर्यंत काम पूर्ण झाले होते. सायखेडापासून पुढे मात्र रस्त्यावर अनेक छोटे-मोठे खड्डे पडले होते. गुजरात राज्यातून शिर्डीकडे येणाºया भाविकांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा रस्ता सायखेडा ते भेंडाळीपर्यंत खराब झाला होता. रस्त्यावर अनेक खड्डे पडले होते. सिन्नर, कोपरगाव तालुक्यातील बरेच प्रवासी नाशिकला येण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. शिवाय गोदाकाठ भागातील अनेक गावे या रस्त्याचा वापर नाशिक, सायखेडा, ओझर, पिंपळगाव येथे जाण्यासाठी करतात. रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे- भाऊसाहेब कमानकर, भेंडाळी