शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कपाट कोंडी फुटल्याने बांधकाम व्यावसायिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:17 IST

शहरातील सुमारे सहा ते साडेसहा हजार इमारतींनी कपाटे सदनिकेत सामावून घेऊन केलेल्या नियमभंगामुळे रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाचा तोडगा स्थायी समितीने मान्य केला आहे.

नाशिक : शहरातील सुमारे सहा ते साडेसहा हजार इमारतींनी कपाटे सदनिकेत सामावून घेऊन केलेल्या नियमभंगामुळे रखडलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाचा तोडगा स्थायी समितीने मान्य केला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून, महापालिकेच्या निर्णयाचे बांधकाम क्षेत्रातून स्वागत होत आहे. परंतु, काही ठिकाणी पाण्याची टाकी, कम्पाउंडिंग वॉल आणि पार्किंग स्पेस लक्षात घेऊन बांधकाम पूर्ण झाले असल्याने महापालिकेच्या निर्णयानुसार अतिरिक्त जागा सोडण्यास अडचणी येण्याची शक्यता असल्याने अशा प्रकरणांमध्ये महापालिकेने सकारात्मक तोडगा काढण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांनी केली आहे.  महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कपाटप्रकरणी सहा आणि साडेसात मीटर रस्त्याच्या रुंदीलगत असलेल्या इमारतींकडून स्वेच्छेने जागा घेऊन नऊ मीटर रुंद रस्ते दाखवण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे सहा व साडेसात मीटर रुंद रस्त्यांलगतच्या मिळकतींना सध्या वापरता न येणारा टीडीआर वापरता येत नसलेला नऊ मीटर संभाव्य रुंद रस्त्याच्या अटीवर संबंधित मिळकतधारकांना वापरता येणार असून, त्यांना ३० टक्के वाढीव चटईक्षेत्र मिळणार आहे. त्यामुळे नियमबाह्य कपाटे नियमित होऊ शकणार असून, त्यामुळे बहुतांशी प्रश्न सुटणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी क म्पाउंडिंग स्कीम अंतर्गत मे महिन्यात संपलेली मुदतही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन महिन्यांसाठी वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कपाटासोबतच क म्पाउंडिंगचा प्रश्नही मार्गी लागल्याने बांधकाम व्यावसायिकांनीही समाधान व्यक्त केले आहे.महापालिकेने कपाट आणि कम्पाउंडिंग संदर्भात घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, महापालिकेचे आयुक्त आणि स्थायी समितीने घेतल्या निर्णयामुळे शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. कपाटाचा प्रश्न सुटण्यासोबतच व्यावसायिकांना वाढीव एफएसआय आणि कम्पाउंडिंगसाठी मुदतवाढ मिळाल्याने व्यावसायिकांचे बहुतेक प्रश्न सुटणार आहेत. - जयेश ठक्कर, संस्थापक,  सदस्य नरेडको, नाशिकमहापालिकेच्या निर्णयामुळे कपाटाचे प्रकरण पूर्णपणे मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे. परंतु कम्पाउंडिंग वॉलसंदर्भात ज्या ठिकाणी पाण्याची टाकी, कम्पाउंडिंग वॉल आणि पार्किं ग स्पेस लक्षात घेऊन बांधकाम झाले आहेस, अशा ठिकाणी अडचणी येऊ शकतात. यातील अडचणी लक्षात घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याची गरज आहे. त्यातूनच व्यावसायिकांच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे.  - उदय घुगे, सचिव,  क्रेडाई, नाशिक

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका