शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण परिमंडळात ९४४ ग्राहकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 00:55 IST

विजेची चोरी तसेच वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची प्रकरणे जिल्ह्यातील लोकअदालतमध्ये ठेवण्यात आल्यानंतर नाशिक परिमंडळातील सुमारे ९४४ ग्राहकांनी ७४ लाखांच्या दंडाचा भरणा करून प्रकरणे निकाली काढली.

ठळक मुद्देलोकअदालत : वीजचोरी, खंडित पुरवठ्याची प्रकरणे निघाली निकाली

नाशिक : विजेची चोरी तसेच वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची प्रकरणे जिल्ह्यातील लोकअदालतमध्ये ठेवण्यात आल्यानंतर नाशिक परिमंडळातील सुमारे ९४४ ग्राहकांनी ७४ लाखांच्या दंडाचा भरणा करून प्रकरणे निकाली काढली.नाशिक शहर, मालेगाव आणि अहमदनगर मंडळातील एकूण ९४४ ग्राहकांनी प्रतिसाद देऊन तडजोडीच्या माध्यमातून नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये घेण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये ७४ लाख १४ हजार रु पयांचा भरणा करून सदर प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.महावितरणकडून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेले व वीजचोरी संबंधित दाखलपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेली हजारो प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. त्यात कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेले ग्राहक यामध्ये मालेगाव मंडळाचे ४४, नाशिक शहर मंडळाचे ८४ अहमदनगर मंडळाचे सहा अशा एकूण ९३४ दाव्यामध्ये ग्राहकांनी तडजोड करीत २५ लाख ३० हजार रुपयांचा भरणा केला तसेच वीजचोरी संबंधित दाव्यांमध्ये मालेगाव मंडळाचे ३९३, नाशिक शहर मंडळाचे १३८ आणि अहमदनगर मंडळामध्ये ३३९ अशा एकूण ८१० दाव्यामध्ये तडजोड करीत ग्राहकांनी ४८ लाख ८४ हजार रु पयांचा भरणा केला आहे.नोटीस दिल्यानंतर प्रकरणे लोकअदालतीतविधी सेवा प्राधिकरण अधिनियमप्रमाणे संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. संबंधितांनी नाशिक व अहमदनगरमधील जिल्हा व तालुका न्यायालयात उपस्थित राहून त्यांनी या संधीचा लाभ घेतला. या लोकअदालतीमध्ये विनाविलंब न्याय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच परस्पर समन्वयासाठी लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :NashikनाशिकelectricityवीजCourtन्यायालय