शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सेसच्या निधीवरून पुन्हा भडका, सदस्यांची सीईओंकडे धाव

By admin | Updated: July 26, 2016 23:50 IST

जलयुक्त शिवार : जिल्हाधिकारी कार्यालयाचा खोडा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून राखीव ठेवण्यात आलेल्या अडीच कोटी रुपयांच्या कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाने काही अटी-शर्ती टाकल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातही आमच्या सेस गाळ काढणे आणि नालाखोलीकरण चालत नसताना खासगी संस्थांकडून लोकसहभागातून हीच कामे कशी चालतात? असा प्रश्न आता सदस्यांनी उपस्थित केला आहे.ताहाराबाद गटाचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रशांत सोनवणे यांच्यासोबत पिंपळकोठा ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सदस्यांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली. डॉ. प्रशांत सोनवणे यांनी त्यांच्या गटातील कातरवेल ते पिंपळकोठा दरम्यानच्या पाटचारीचे काम जलयुक्त शिवार अभियानातून सुचविले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेचे प्रस्ताव मंजूर करताना टाकलेल्या दहा प्रकारच्या अटी-शर्तीमध्ये गाळ काढणे व नाला खोेलीकरणाची कामे घेता येणार नाहीत, असे नमूद केल्यानंतर कातरवेल ते पिंपळकोठा हे नाला खोलीकरणाचे काम घेता येणार नसल्याचे लघुपाटबंधारे विभागाने स्पष्ट करताच डॉ. प्रशांत सोनवणे यांनी पिंपळकोठाचे माजी सरपंच नितीन भामरे यांच्यासह भाऊसाहेब नांद्रे, भाऊसाहेब भामरे, संजय भामरे आदिंसह मंगळवारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली. त्यावेळी गावची मागणी असल्यानेच आपण हे काम प्रस्तावित केल्याचे डॉ. प्रशांत सोनवणे यांनी मिलिंद शंभरकर यांना सांगितले. त्यामुळे शंभरकर यांनी लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे यांना बोलावून घेत त्यांना याबाबत विचारणा केली. वाघमारे यांनी जलयुक्त शिवार योजनेतील कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाने अटी-शर्ती सुचविल्याने हे काम तांत्रिकदृष्ट्या घेता येणार नसल्याचे सांगितले. त्यावरून सेस निधी जिल्हा परिषदेचा असताना आणि सदस्यांनी सुचविलेले काम होणे अपेक्षित असताना या आडकाठ्या कशाला? असे डॉ. प्रशांत सोनवणे यांनी मिलिंद शंभरकर यांना सांगितले. त्यानंतर या कामांचे अंदाजपत्रक पाहून त्यात अटी-शर्तींचा भंग होणार नसल्यास या कामांना मंजुरी देण्याची तयारी चंद्रशेखर वाघमारे यांनी दर्शविल्याने या वादावर पडदा पडला. (प्रतिनिधी)