शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

व्याख्यानमालेची सुटका; प्रतिष्ठानला मात्र फटका

By admin | Updated: August 6, 2014 02:03 IST

व्याख्यानमालेची सुटका; प्रतिष्ठानला मात्र फटका

 

नाशिक : कठोर परिश्रम घेत सातत्याने पाठपुरावा केला तर यश निश्चित मिळते, याचे उदाहरण नाशिक वसंत व्याख्यानमाला या संस्थेने घालून देत अवसायनात गेलेल्या श्रीराम बॅँकेत अडकलेली संपूर्ण ठेव परत मिळविली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्याही सुमारे १२ लाख रुपयांच्या ठेवी श्रीराम बॅँकेत अडकल्या आहेत; परंतु या ठेवी मिळविण्याबाबत प्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ मख्खपणे बसून आहे. त्यामुळेच की काय, प्रतिष्ठानच्या लेखापरीक्षणात सनदी लेखापालांनी टिपणी नोंदविताना सदर ठेवी लवकरात लवकर परत मिळविण्याच्या दृष्टीने न्यासाने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे. सन २००७ मध्ये श्रीराम बॅँक अवसायनात निघाल्याने ठेवी परत मिळविण्याबाबत विश्वस्त संस्थांपुढे मोठा पेच उभा राहिला. शहरातील सुमारे ८९ विश्वस्त संस्थांच्या लाखोच्या ठेवी श्रीराम बॅँकेत अडकल्या आहेत. रिझर्व्ह बॅँकेच्या विमा धोरणानुसार काही संस्थांना एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी परत मिळाल्या. नाशिक वसंत व्याख्यानमालेचीही पाच लाख ८९ हजार रुपयांची ठेव श्रीराम बॅँकेत अडकली होती. व्याख्यानमालेच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत संपूर्ण ठेव परत मिळविली. मालेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी अनेक पर्यायांचा शोध घेतला. अखेरीस थकबाकीदार कर्जदाराच्याच माध्यमातून तोडगा काढत मालेने संपूर्ण ठेव परत मिळविण्यात यश मिळविले. श्रीराम बॅँकेत कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्याही १२ लाख २६ हजार ५१५ रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. सुरुवातीच्या काळात प्रतिष्ठानच्या काही पदाधिकाऱ्यांनी बॅँकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विश्वस्ताच्या मदतीने ठेवी परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु नंतर त्याबाबत सातत्याने पाठपुरावा झाला नाही. सद्यस्थितीत सुमारे पावणेतीन लाखांचे व्याज व मुदतठेवीची रक्कम याप्रमाणे सुमारे १५ लाख रुपयांच्या वर रक्कम अडकून पडली आहे. प्रतिष्ठानचे कोषाध्यक्षपदही बॅँकिंग क्षेत्रात तज्ज्ञ समजल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या हाती आहे; परंतु त्यांनाही ठेवी परत मिळविण्याच्या दृष्टीने पर्याय शोधता आलेले नाहीत. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा सन २०१३-१४ चा वार्षिक अहवाल सभासदांना नुकताच वितरित झाला असून, त्यात सनदी लेखापालांनी हिशेबासंबंधी टिप्पणी करताना श्रीराम बॅँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे येत्या ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या प्रतिष्ठानच्या वार्षिक सभेत ठेवींचा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)