शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनींची उपग्रहाद्वारे पुनर्मोजणी

By admin | Updated: September 1, 2014 01:25 IST

शेतजमिनींची उपग्रहाद्वारे पुनर्मोजणी

नाशिक : राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यातील शेतजमिनींची उपग्रहाद्वारे पुनर्मोजणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. ब्रिटिश काळात पहिल्यांदा शेतजमिनींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच शेतजमिनींच्या पुनर्मोजणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. जमिनींचे मोठ्या प्रमाणात झालेले पोटविभाजन, प्रत्यक्ष वहिवाट, भूमिअभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात निर्माण झालेला गोंधळ, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीविषयक वाद निर्माण होऊन विकास प्रक्रियेत अडथळे उत्पन्न होत असतात. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जमिनीची पुनर्मोजणी करण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट खोऱ्यातील १२ गावांमध्ये पुनर्मोजणीचा पथदर्शी प्रकल्प मागील दोन वर्षांत राबविला होता. या पथदर्शी प्रकल्पाच्या अनुभवाच्या आधारे राज्याची पुनर्मोजणी करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला होता. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाने पुनर्माेजणी करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली असून, राज्याची मोजणी तीन टप्प्यांत करण्याचे ठरविले आहे. पहिल्या टप्प्यात विभागीय मुख्यालय असलेल्या नाशिकसह पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या सहा जिल्ह्यांत शेतजमिनींची पुनर्मोजणी करण्यात येणार आहे. ग्राउंड कंट्रोल पॉर्इंट निर्मिती, नकाशांचे डिजिटलायझेशन आणि सॅटेलाईट इमेजद्वारे ही मोजणी खासगी संस्थांमार्फत करण्यात येणार आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मोजणी नकाशाचे वाटप करून हरकतींवर निर्णय घेणे, गावाचा नकाशा तयार करणे, गावाचे नवीन महसूल रेकॉर्ड लागू करण्याची कार्यवाही आदि बाबी भूमिअभिलेख विभागामार्फत राबविल्या जाणार आहेत. नागरिकांना मोजणी नकाशाचे वाटप झाल्यानंतर भोगवटादारांकडून प्रतिएकर ३०० रुपये सनद फी घेण्यात येणार आहे. या पुनर्मोजणीमुळे नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक विकासाचे प्रकल्प राबविणे, शासनाच्या विविध योजनांचे लाभ घेणे व जमीनविषयक वाद निकाली काढण्यास मदत होणार आहे.