शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरचा रुग्णावर उपचारास नकार

By admin | Updated: May 22, 2017 02:38 IST

नाशिक : रुग्णावर रुग्णालयातील डॉ़ दिनेश पवार यांनी उपचारास नकार देत रुग्णांच्या नातेवाइकांसोबत अरेरावी केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णावर रुग्णालयातील डॉ़ दिनेश पवार यांनी उपचारास नकार देत रुग्णांच्या नातेवाइकांसोबत अरेरावी केल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली़ यावेळी डॉ़ पवार हे मद्यधुुंद असल्याचा आरोप रुग्णांच्या नातवाइकांनी केला असून, पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीमुळे सुमारे दोन तासांनी या प्रकरणावर पडदा पडला़ तर दुसऱ्या डॉक्टरांकडून रुग्णावर उपचार करून घेण्यात नातेवाईक व्यस्त असल्याची संधी साधून डॉ़ पवार यांनी रुग्णालयातून पळ काढला़जिल्हा शासकीय रुग्णालयात इगतपुरी तालुक्यातील मायदरा गावातील नरहरी लोहकरे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचार होत नसल्याने रुग्णाचे वडील व शिवसेनेच्या खेड गटाचे जिल्हा परिषद सदस्य तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या सदस्य हरिदास लोहकरे हे रात्री दहा वाजेच्या सुमारास रुग्णालयात पोहोचले़ त्यांना रुग्णालयात कर्तव्यावर असलेले डॉ. दिनेश पवार हे मद्यधुंद अवस्थेत आढळून आले़ त्यातच पवार हे उपचार करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला़ यानंतर लोहकरे व रुग्णाच्या नातेवाइकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ सुरेश जगदाळे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ गजानन होले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही़ यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी डॉ़ पवार यांना जाब विचारला असता बर्निंग वॉर्डमधील रुग्णावर उपचार करण्याच्या बहाण्याने सटकण्याचा प्रयत्न केला़ या घटनेची माहिती सरकारवाडा पोलिसांना कळताच त्यांनी रुग्णालयात पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली़ तसेच रुग्णाच्या नातेवाइकांची समजूत काढत असतानाच पवार ही संधी साधून निघून गेले़ दरम्यान, जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यास नकार तसेच मद्यधुंद डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार होत असल्याने जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी जिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी आणि सरकारवाडा पोलिसांकडे लेखी तक्रार केली असून, डॉ. पवार यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.