शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील विक्रेत्यांचा मंडईत स्थलांतरास नकारच

By admin | Updated: May 10, 2017 00:29 IST

सातपूर : रस्त्याच्या कडेला अतिक्र मण करून व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेत्यांना मंडईत स्थलांतरित करण्यात यावे या मागणीसाठी मंडईतील भाजीविक्रे त्यांनी सोमवारी विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : सातपूर गावातील रस्त्याच्या कडेला अतिक्र मण करून व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेत्यांना मंडईत स्थलांतरित करण्यात यावे या मागणीसाठी मंडईतील भाजीविक्रे त्यांनी सोमवारी मनपाच्या विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील भाजीविक्रे त्यांनीच पुढाकार घेऊन तत्कालीन विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांची भेट घेऊन रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांचे  अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. या विक्रेत्यांना मंडईत असलेल्या जागेवर कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यात यावे आणि रस्ता कायमस्वरूपी मोकळा करावा, सणासाठी बसणाऱ्या विक्रेत्यांनादेखील मंडईत बसविण्यात यावे, पार्किंगची सोय करावी, मंडईतील शौचालयाची नियमित साफसफाई करावी, पाण्याची सोय करावी यांसह विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.  या मागणीची दखल घेत तत्कालीन विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी मंडईतील अतिरिक्त जागेची मोजणी करून जागेची आखणी केली होती. आखणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना  भाजीविक्रेत्या व्यावसायिकांकडून सहकार्य करण्यात आले होते. त्यानंतर बऱ्याच दिवसांंचा कालावधी उलटला तरी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. म्हणून सोमवारी (दि.८) पुन्हा मंडईतील भाजीविक्रे त्यांनी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांची भेट घेऊन मंडई बाहेरील भाजीविक्रे त्यांना मंडईत स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.  यावेळी नगरसेवक सीमा निगळ, दीक्षा लोंढे यांच्यासह शंकर पाटील, दत्तात्रय मोराडे, संदीप आव्हाड, बाळू सांगळे, अण्णासाहेब पाटील, लीलाबाई पिंगळे, योगेश बैरागी, मथुरा उबाळे, विमल काश्मिरे, चंद्रिका प्रसाद, लता काठे, संतोष भंदुरे, अंजना बैरागी, धर्मा वडनेरे आदिंसह भाजीविक्रेते  उपस्थित होते.