शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मर्जीतल्या कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना

By admin | Updated: May 7, 2017 00:18 IST

नाशिक : महापालिकेत सुमारे ६५० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. गेडाम यांनी दणका दिला होता.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेत एकाच विभागात एकाच जागी वर्षानुवर्षांपासून भुजंगासन घालून बसलेल्या सुमारे ६५० हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत मागील वर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दणका दिला होता. महापालिकेच्या इतिहासात एकाच वेळी झालेल्या बदल्यांचा हा ‘गेडाम पॅटर्न’ चर्चेत ठरला होता. मात्र, गेडाम यांच्या बदलीनंतर वर्षभरातच मर्जीतल्या अनेक कर्मचाऱ्यांची पूर्वीच्याच विभागात पुनर्स्थापना झालेली असून, प्रशासनानेच ‘गेडाम पॅटर्न’ गुंडाळून ठेवला आहे. दरम्यान, गेडाम यांच्यानंतर आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणाऱ्या अभिषेक कृष्ण यांनी बदल्यांविषयक धोरण नियमावली तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र, अद्याप नियमावलीची प्रतीक्षा कायम असून, यावर्षी बदल्यांची चर्चाही ऐकायला मिळत नाही. महापालिकेत बऱ्याच वर्षांनंतर डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत अनेकांची मक्तेदारी मोडीत काढली होती. वर्षानुवर्षांपासून एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना डॉ. गेडाम यांनी धक्का देत महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणावर बदल्यांची प्रक्रिया राबविली होती. तीन टप्प्यात राबविलेल्या या बदली प्रक्रियेचे कमी-अधिक प्रमाणात पडसादही उमटले होते. गेडाम यांनी पहिल्या टप्प्यात ११ संवर्गातील २४९ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, तर दुसऱ्या टप्प्यात २८५ लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांना झटका देत मुख्यालयातून त्यांची रवानगी विभागीय कार्यालयांमध्ये केली होती. गेडाम यांच्या या दणक्यामुळे अनेक कामचुकारांची कोंडी झाली होती. प्रशासकीय कामकाजात झालेल्या या साफसफाई मोहिमेचे स्वागतही झाले आणि त्यामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याची टीकाही झाली. गेडाम यांची मागील वर्षी जूनमध्ये बदली झाल्यानंतर अभिषेक कृष्ण यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांमुळे प्रशासकीय कामकाजात अडचणी येत असल्याची ओरड काही विभागप्रमुखांकडून झाली. आपल्या मर्जीतल्या लोकांची अन्यत्र बदली झाल्याने विभागप्रमुखांचीही गैरसोय झाली होती. त्यावेळी आयुक्तांनी काही बदल्यांबाबत फेररचना केली. परंतु, गेल्या वर्षभरात बदली झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना झाली असून, अनेकांनी पुन्हा एकदा आपल्या मूळ जागेवर ठाण मांडले आहे. त्यात काही कर्मचाऱ्यांची बदली प्रशासकीय कारणास्तव तर काहींची लोकप्रतिनिधींच्या शिफारशींवरून झाली असून, ज्या प्रशासनाने बदल्यांचा कठोर निर्णय घेतला त्याच प्रशासनाने गेडाम पॅटर्न पूर्णपणे गुंडाळून ठेवत अनेकांना ‘अभय’ दिले आहे.