शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

शंभरी गाठलेल्या आजींचे १९५२ पासून नियमित मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:30 IST

देशात संविधान अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९५२ साली लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.

नाशिक : देशात संविधान अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९५२ साली लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते सोमवारी (दि.२९) झालेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिक लोकसभा मतदारसंघातील गौळाणे येथील वयाची शंभरी गाठलेल्या सखूबाई नामदेव चुंभळे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. देशात १९५२ पासून आजपर्यंत झालेल्या सर्व १७ निवडणुकांमध्ये त्यांनी मतदान केले आहे.  मतदान करणे ही आपली लोकशाही अबाधित राखण्यासाठी सर्वांची जबाबदारी असून, मतदान केल्यानंतर आपण जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा घटक असल्याची अनुभूती म्हणजे सर्वाधिक आनंदाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळेच मतदान हा केवळ आपला हक्क म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक असल्यानेच आपण आतापर्यंत कधीही न चुकता प्रत्येकवेळी मतदानाचा हक्क बजावल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, सखूबाई चुंभळे यांचा नातू विश्वास चुंभळे सोमवारी सकाळी त्यांना गौळाणे येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर घेऊन आल्यानंतर सखूबार्इंनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक