शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

किडनीदाता कुटुंबातील नसल्यास झेडटीसीसीकडे नोंदणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:11 IST

नाशिक : कुटुंबाबाहेरील ब्रेनडेड व्यक्तीची किडनी एखाद्या किडनी रुग्णाला आवश्यक असते, अशा प्रकरणांमध्ये संबंधित रुग्णाची नाव नोंदणी झोनल ट्रान्सप्लान्ट ...

नाशिक : कुटुंबाबाहेरील ब्रेनडेड व्यक्तीची किडनी एखाद्या किडनी रुग्णाला आवश्यक असते, अशा प्रकरणांमध्ये संबंधित रुग्णाची नाव नोंदणी झोनल ट्रान्सप्लान्ट को-ऑर्डिनेशन कमिटीकडे (झेडटीसीसी) करणे बंधनकारक असते; मात्र अनेक किडनीरुग्ण, कुटुंबीय आणि नातेवाइकांमध्ये या माहितीचा अभाव असल्याने अनेक रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागतो.

अनेक किडनी रुग्णांसाठी किडनी ट्रान्सप्लांट हाच एकमेव पर्याय उरलेला असतो. अशा परिस्थितीत एकतर कुटुंबातील व्यक्ती किंवा कुटुंबाबाहेरील कुणी अज्ञात ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीची किडनी हेच पर्याय असतात. कुटुंबातील व्यक्तीची किडनी असल्यास ज्या रुग्णालयात हे ट्रान्सप्लांट करायचे असते, तेथील एथिक्स कमिटी दोघांचेही सर्व डिटेल्स घेऊन त्यांची वैद्यकीय माहिती तपासून घेते. त्याशिवाय शासनाच्या ट्रान्सप्लांट कमिटीकडे किडनीदाता आणि रुग्ण अशा दोघांची मुलाखत घेऊन त्यानंतरच कुटुंबातील व्यक्तीची किडनी देण्यास परवानगी अथवा न देण्याचा निर्णय या समितीकडून घेतला जातो. नाशिक जिल्ह्यासाठी धुळे वैद्यकीय महाविद्यालयात ही वैद्यकीय समिती निर्धारित करण्यात आली असून, या समितीच्या परवानगीनंतरच ऑपरेशनचा निर्णय होऊ शकतो; मात्र, ज्या रुग्णांना कुटुंबातील कुणाचीही किडनी चालणार नसते, किंवा कुटुंबातील अन्य कुणी त्यासाठी तयार नसते, अशावेळी ब्रेनडेड रुग्णाची किडनी मिळेपर्यंत वाट पहावी लागते; मात्र त्यासाठीदेखील झेडटीसीसी समितीकडे आधी नाव नोंदणी आवश्यक असते. महाराष्ट्रात केवळ मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या चार ठिकाणीच ही झेडटीसीसी नाव नोंदणीची व्यवस्था आहे. त्या विभागातील अन्य जिल्हे या चार जिल्ह्यांना जोडण्यात आले आहेत. त्यात नाशिक हे पुणे जिल्ह्याला जोडलेले आहे. अवयवदान प्रत्यारोपणाचा कायदा १९९५ मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर किडनी, लिव्हरसह अन्य अवयवांचे दान करण्यास सुरुवात झाली; मात्र याबाबत अजूनही फारशी जनजागृती झालेली नाही. झेडटीसीसी कशा पद्धतीने कामकाज करते, त्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागते, याबाबत सर्वसामान्यांना माहितीच नसल्याने अनेकांना अवयवाची गरज असूनही वंचित रहावे लागत आहे.

इन्फो

प्रतीक्षा यादीनुसार उपलब्धता

झेडटीसीसीने रिट्राइव्हल सेंटर म्हणून मान्यता दिलेल्या मोठ्या हॉस्पिटल्समध्येच हे अर्ज उपलब्ध केले आहेत. किडनीची गरज आहे, याची नोंद करून हे फॉर्म तेथेच जमा केल्यानंतर रिट्राइव्हल सेंटरकडून पुण्यातील केईएम हॉस्प‌िटलमधील झेडटीसीसीकडे हा फॉर्म पाठविला जातो. झेडटीसीसी अवयवांची गरज असणाऱ्या रुग्णांची प्रतीक्षा यादी तयार करते, तसेच संबंधिताच्या प्रतीक्षा यादीनुसार त्याच्यासाठी किडनी उपलब्ध होईल, त्या पद्धतीने यादीनुसार गरजूंना किडनी किंवा अन्य अपेक्षित अवयवांचे प्रत्यारोपण केले जाते.

इन्फो

माहिती दिली जाते

झेडटीसीसीबाबत फारच कमी रुग्णांना आणि कुटुंबीयांना माहिती असते; मात्र ज्या रुग्णांना तशी नोंदणी आवश्यक असते, त्यांना किंवा कुटुंबीयांना त्याबाबतची माहिती संबंधित हॉस्पिटलकडून दिली जाते.

डॉ. देवदत्त चाफेकर, किडनी विकार तज्ज्ञ.