नाशिक : गोल्फ क्लब मैदान येथे रविवारी (दि.१) आयोजित महाआरोग्य शिबिरासाठी जिल्ह्यातील विविध केंद्रांत रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, दुपारपर्यंत एकूण ७५ हजारांपेक्षा जास्त विविध आजारांच्या रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.जिल्ह्यातून नेत्ररोगाचे ८२७७, हृदयरोग २४२९, अस्थि व्यंगोपचार ५५१५, जनरल सर्जरी ३१४६, मेंदूरोग १६२३, बालरोग २०८९, मूत्ररोग १२४९, प्लास्टिक सर्जरी ३६३, कान-नाक-घसा ४३१०, स्त्रीरोग २३११, जनरल मेडिसीन ५१६७, श्वसन विकार ११७०, कर्करोग २५०, ग्रंथींचे विकार ४५४, रेडिओलॉजी ३५३, दंतरोग २१५४, लठ्ठपणा २८१, आयुष व इतर पारंपरिक उपचारपद्धती ४९९, त्वचारोग २२८४ आणि मानिसक आरोग्यासंबंधी ९०८ रुग्णांना संदर्भित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त नाशिक महापालिका क्षेत्रातून नेत्ररोगाचे ३६३५, हृदयरोग ८८१, अस्थि व्यंगोपचार २१२६, जनरल सर्जरी ८९७, मेंदूरोग ७९२, मूत्ररोग २३३, कान-नाक-घसा १४६५, स्त्रीरोग ८१७, जनरल मेडिसीन २१४९ यांसह प्लास्टिक सर्जरी, बालरोग, श्वसन विकार, कर्करोग, ग्रंथीचे विकार, रेडिओलॉजी, दंतरोग, लठ्ठपणा, आयुष व इतर पारंपरिक उपचारपद्धती, त्वचारोग आणि मानसिक आरोग्यासंबंधी रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतील रुग्णालयांमार्फ त झालेल्या तपासणीत सहा हजार ५५७ रुग्णांना संदर्भित करण्यात आले आहे. विविध खासगी शिबिरांच्या माध्यमातूनही रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
७५ हजारांहून अधिक रु ग्णांची नोंदणी
By admin | Updated: December 31, 2016 22:54 IST