शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमधून होणार ‘आधार’ची नोंदणी

By admin | Updated: August 10, 2015 23:25 IST

धावपळ थांबणार : येत्या आठवड्यात होणार अंमलबजावणी

नाशिक : आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद पडल्याने नागरिकांची होणारी धावपळ लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शाळांमध्येही लवकरच आधारकार्ड नोंदणी यंत्र उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी पालकांची धावपळ थांबणार आहे.शहरातील अनेक आधार केंद्रांवर नोंदणी करताना पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आणि झालेल्या वादांचे पर्यावसन म्हणून अनेक केंद्रे बंद झाली. त्यातच विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच शासनाने आधारकार्ड अनिवार्य केल्याने ते काढण्यासाठी नागरिकांची केंद्रांवर गर्दी होऊ लागली. संबंधित संस्थेने मोजक्याच ठिकाणी ही केंद्रे सुरू ठेवल्याने त्याही ठिकाणी पहाटेपासूनच रांगा लावाव्या लागल्या. त्यातच महापालिकेने सोमवारपासून सर्व विभागीय कार्यालयात आणि सेतूच्या चारही कार्यालयांमध्ये नोंदणी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शाळेतील विविध योजनांसाठी विद्यार्थ्यांनाही आधारकार्डची मागणी केली जात असल्याने त्यांच्या आधारकार्डची चिंता पालकांना सतावत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन केंद्रांवर सकाळपासून रांगेत उभे राहावे लागत होते. त्यातून सुटका होण्यासाठी पालिकेने शहरांतील मनपा शाळांसह खासगी शाळांमध्येही त्याची व्यवस्था केली आहे. त्यानुसार सोमवारपासून शाळेनिहाय विद्यार्थ्यांची नोंदणी होऊ शकेल. यासाठी जिल्हा प्रशासनाने शाळांसाठी १२ यंत्रे उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली असून, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी पालकांना केंद्रांवर रांग लावावी लागणार नाही. त्यातच पालिकेच्या कार्यालयांमध्ये नोंदणी सुरू होणार असल्याने उर्वरित नोंदणीही पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ८५ टक्के नागरिकांनी आधार नोंदणी केल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. उरलेल्यांमध्ये शालेय मुलांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यास लवकरच जिल्ह्यातील सर्वच नागरिकांची नोंदणी पूर्णत्वास जाऊ शकेल. (प्रतिनिधी)