शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बीएलओंकडून नोंदणीचे काम सुरू घरोघरी जाऊन नोंदणी : ३० नोव्हेंबरपर्यंत कामकाज केले जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:44 IST

नाशिक : मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील बुथनिहाय केंद्रस्तरीय अधिकाºयांनी बुधवारपासून घरोघरी जाऊन मतदार नोंदणीबरोबरच मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. शिक्षकांना या कामातून वगळावे अन्यथा कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता, त्यापार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबरपर्यंत कामकाज केले जाणार आहे.

ठळक मुद्दे नाशिक , बीएलओंकडून नोंदणीचे काम सुरूमतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामास सुरुवात

नाशिक : मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील बुथनिहाय केंद्रस्तरीय अधिकाºयांनी बुधवारपासून घरोघरी जाऊन मतदार नोंदणीबरोबरच मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. शिक्षकांना या कामातून वगळावे अन्यथा कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता, त्यापार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबरपर्यंत कामकाज केले जाणार आहे.निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये १५ ते ३० नोव्हेंबर यादरम्यान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम करतील. त्यात प्रत्येक मतदाराची घरोघरी जाऊन खात्री पटविण्याबरोबरच नवीन नाव नोंदणे, दुबार व मयत मतदारांची नावे कमी करणे, मतदार यादीसाठी छायाचित्रं गोळा करणे, मतदारांचे भ्रमणध्वनी क्रमांक गोळा करणे आदी कामे या काळात करण्यात येणार आहे. या कामासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्तांनी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. परंतु या कामासाठी शिक्षकांचीच नेमणूक करण्यात आल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली होती. बुथनिहाय मतदार यादीचे वाटप सध्या शालेय परीक्षेचे काम सुरू असताना त्यात मतदार यादीचे काम सोपविल्याने शिक्षकांनी नकार दिला होता. परंतु निवडणूक कायद्यान्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने अखेर बुधवारपासून त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बुथनिहाय त्यांना मतदार यादीचे वाटप करण्यात आले असून, त्यानुसार आता ते घरोघरी जातील. ३० नोव्हेंबरपर्यंत नवीन मतदार नोंदणीची अखेरची संधी आहे. आता नाव नोंदलेल्या मतदारांची अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध होणार आहे.