शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वैधता प्रमाणपत्र देतांना संबंधित विभागाची मनमानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 19:40 IST

देवळा : अर्जदाराने रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास इतर कागदपत्रांची किंवा पुराव्याची मागणी न करता संबंधित अर्जदाराने सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा म्हणून सक्षम अधिकाऱ्याने अर्जदाराला प्रमाणपत्र निर्गमित करावे असा शासनाचा निर्णय असतांनाही संबंधित यंत्रणा त्याचे त्याचे पालन करत नसल्यामुळे अर्जदार त्रस्त झाले आहेत. शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी न करणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अर्जदारांकडून करण्यात येत आहे.

ठळक मुद्देदेवळा : शासन परीपत्रकांकडे दुर्लक्ष; अर्जदार झाले त्रस्त

देवळा : अर्जदाराने रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्यास इतर कागदपत्रांची किंवा पुराव्याची मागणी न करता संबंधित अर्जदाराने सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्र महत्वाचा पुरावा म्हणून सक्षम अधिकाऱ्याने अर्जदाराला प्रमाणपत्र निर्गमित करावे असा शासनाचा निर्णय असतांनाही संबंधित यंत्रणा त्याचे त्याचे पालन करत नसल्यामुळे अर्जदार त्रस्त झाले आहेत. शासन निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी न करणाºया अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अर्जदारांकडून करण्यात येत आहे.सामाजिक न्याय विभागाने काढलेल्या अधिसुचनेनुसार राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्गासाठी त्यांना शासकीय सेवातील तसेच शिक्षणातील आरक्षित जागांचा लाभ मिळण्यासाठी जातीच्या दाखल्याबरोबर जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत होते. यामुळे शासनाकडे अनेक तक्र ारी येत होत्या. या प्रक्रि येत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने वैधता प्रमाणपत्रे विलंबाने मिळण्यामुळे संबंधित विद्याथ्र्यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन, त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या नियमांमध्ये सुधारणा केली.या निर्णयामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व अन्य संबंधितांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु ह्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे वारंवार परिपत्रके काढून सुचना देण्याची वेळ शासनावर आली आहे.रक्ताच्या नात्यातील व्यक्तिचे जात वैधता प्रमाणपत्र असतांनाही अर्जदाराला पुर्वीप्रमाणेच सर्व कागदपत्रांची पुर्तता करावी लागत असून त्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, यामुळे अर्जदार त्रस्त झाले आहेत. नुकतेच ६ मार्च २०१९ रोजी जात वैधता प्रमाणपत्र देतांना सुधारीत अधिसुचनेप्रमाणे नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सुचना देणारे परिपत्रक शासनाने काढले आहे. परंतु उपयोग झालेला नाही.वैधता प्रमाणपत्र मिळणे कठीण होऊन बसले होते. १९५० ते १९६७ पूर्वीचे जातीचे पुरावे सादर करणे अवघड जात असल्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागून काल अपव्यय होत होता. त्यामुळे मागास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशात अडचणी येत. त्यांना शिष्यवृत्ती, शुल्क सवलतही मिळणे कठीण होते.