त्र्यंबकेश्वर : कुंभमेळा यशस्वीतेसाठी योग्य नियोजन करून स्वच्छता ठेवल्याबद्दल मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात त्र्यंबक नगरपालिकेचे मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व प्रशस्ती पत्रक देण्यात आले. सिंहस्थ नियोजनाच्या बैठका, आराखडे, निविदा काढणे, कामांचे वाटप, कामावर वेळोवेळी भेटी देऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करून घेऊन त्र्यंबकेश्वर येथील स्वच्छता व हरित कुंभ यशस्वी पार पाडण्यास नागरे यांनी अथक प्रयत्न केले. डपिंगमधील सर्व कचरा हटविण्यापासून तर अतिक्रमण दूर करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कुंभमेळादरम्यान शहरात कोणतीही रोगराई पसरणार नाही, यासाठी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, प्रांताधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या मदतीने अथक परिश्रम घेऊन कुंभमेळा यशस्वी केला. त्र्यंबक नगर परिषदेचे अभियंता प्रशांत जुन्नरे, अमोल दोंदे, नितीन शिंदे तसेच श्यामराव गोसावी हेही मुख्याधिकारी नागरे यांच्या समवेत होते.यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, नाशिक महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, नाशिकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, तसेच राज्याचे मुख्यसचिव स्वाधीन क्षत्रिय, न. पा. प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, पाटणकर आदिंसह त्र्यंबक नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.त्र्यंबकच्या स्वच्छतेबाबत आलेल्या भाविकांनी व साधू महंतांनीही समाधान व्यक्त केले आहे़(वार्ताहर)
त्र्यंबकेश्वरच्या स्वच्छतेची शासनाकडून दखल
By admin | Updated: October 4, 2015 23:29 IST