शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपातास नकार; पत्नीला पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 05:53 IST

गर्भपातास नकार दिल्याने पत्नीला पेटविल्याची घटना शनिवारी रात्री येथे घडली

सटाणा (नाशिक) : गर्भपातास नकार दिल्याने पत्नीला पेटविल्याची घटना शनिवारी रात्री येथे घडली. पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेचा दीर व सासराही या गुन्ह्यात सहभागी होता.यात गर्भवती रुपाली विलास कुमावत (२४) ५५ टक्के भाजली असून तिच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती आपल्या मुलांसह पती विलास दशरथ कुमावत, दीर योगेश व सासरा दशरथ गंगाधर कुमावत समवेत वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वी रुपालीला दिवस गेल्यापासूनच घरात खटके उडत होते. गर्भपात करत नाही म्हणून तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. दरम्यान शनिवारी रात्री नऊच्या सुमारास याच कारणावरून चौघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्या वेळी विलासने दांडूक्याने रुपालीला बेदम मारहाण केली. गर्भपात केला नाही तर तुला जाळून टाकू, अशी धमकी देत विलासने रुपालीच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि दीर योगेशने पेटवून दिले, असे रुपालीने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसात तिघांविरुद्ध प्राणघातक हल्ला व हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघेही पसार झाले आहेत.सात वर्षांपूर्वी विलास आणि रुपाली यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांना तीन अपत्य असून पाच महिन्यांपूर्वी तिला पुन्हा दिवस गेले होते. दोन महिन्यांपासून तिच्यावर गर्भपातासाठी दबाव टाकण्यात येत होता. ही थरारक घटना उघडकीस आल्यानंतर रुपालीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घालून तिघांना अटक करण्याची मागणी केली.