शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विकतचे प्लॅस्टिक मनपाला फुकटात देण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:52 IST

राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी केल्यानंतर वितरकांना आपल्याकडील साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली. त्यानुसार महापालिकेनेदेखील प्लॅस्टिक संकलित करण्यासाठी तीन केंद्रे सुरू केली. परंतु वितरकांनी लाखो रुपयांचा साठा महापालिकेचा फुकटात देण्याऐवजी गुजरात, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांत विकला असून, बहुतांशी कंपन्यांनीच व्यापाऱ्यांकडून माल परत घेतल्याने त्यांचे नुकसान टळले आहे.

नाशिक : राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी केल्यानंतर वितरकांना आपल्याकडील साठ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली. त्यानुसार महापालिकेनेदेखील प्लॅस्टिक संकलित करण्यासाठी तीन केंद्रे सुरू केली. परंतु वितरकांनी लाखो रुपयांचा साठा महापालिकेचा फुकटात देण्याऐवजी गुजरात, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांत विकला असून, बहुतांशी कंपन्यांनीच व्यापाऱ्यांकडून माल परत घेतल्याने त्यांचे नुकसान टळले आहे.राज्य शासनाच्या पर्यावरण खात्याच्या वतीने गुढीपाडव्यापासून बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाजारातील किरकोळ दुकानांमध्ये प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर बहुतांशी बंद झाला आहे, तर प्लॅस्टिकचा व्यापार करणाºयांना शासनाने आधी एक महिना आणि नंतर तीन महिने अशी प्लॅस्टिक अन्य राज्यांत पाठविणे, मूळ कंपनीला परत पाठविणे किंवा अन्य मार्गाने विल्हेवाट लावण्यासाठी मुदत दिली आहे. यादरम्यान, प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी महापालिकेने शहरात तीन ठिकाणी कचरा संकलन केंद्र सुरू केले आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांत त्यात फक्त तीस टन प्लॅस्टिकच संकलित झाले होते, सदरचे प्लॅस्टिक हे खत प्रकल्पावरील फर्नेश आॅईल निर्मितीच्या कामात वापरण्यात आले आहे. परंतु बहुतांशी व्यापाºयांनी प्लॅस्टिक खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असल्याने ते महापालिकेचा फुकटात देण्याऐवजी अन्य राज्यांतील व्यापाºयांना विकले आहे. राज्य शासनाने प्लॅस्टिक साठ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी दिलेली मुदत येत्या २३ जून रोजी संपणार आहे, परंतु तत्पूर्वी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर शुक्रवारी (दि. २२) सुनावणी असून, त्याकडे आता व्यापाºयांचे लक्ष लागून आहे. बाजारात अद्यापही प्लॅस्टिकला पर्याय नाही, कापडी पिशव्या उपलब्ध नाही. किराणा दुकानदारांसह अन्य अनेक ठिकाणी ग्राहक प्लॅस्टिकच्या पिशव्यांची मागणी करतात, त्या न दिल्यास सामान घेत नाहीत, त्यामुळे व्यवसायाला मोठा फटका बसल्याचे व्यापारी संघटनेचे प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले.महापालिकेने वसूल केलेला दंड व केसेसमहापालिकेच्या आरोग्य विभागाने मार्च महिन्यापासून प्लॅस्टिक वितरक आणि दुकानदार यांच्यावर व्यापक कारवाई केली आहे. पंचवटी विभागात १४ केसेस करण्यात आल्या असून ७६ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. नाशिकरोड विभागात २३ केसेस करण्यात आल्या असून १ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नाशिक पूर्वमध्ये २१ केसेस आणि ९७ हजार रुपयांचा दंड तर पश्चिम विभागात ७ केसेस आणि ३५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे. सिडको विभागात ७ केसेस आणि ३५ हजार रुपये दंड तर सातपूर विभागात ७० हजार रुपये वसूल करण्यात आला असून, १४ केसेस करण्यात आल्या आहेत. पाच हजार रुपये प्रत्येकी अशाप्रकारचा दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला असून, आत्तापर्यंत ५ लाख १४ हजार ५०० रुपये असा दंड करण्यात आला आहे.रविवारपासून नागरिकांवरही कारवाईमहापालिकेने मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत व्यापारी आणि दुकानदारांवर कारवाई केली आहे. परंतु आता यापुढे २३ तारखेनंतर सामान्य नागरिकांवरदेखील कारवाई करण्यात येणार आहे.  प्लॅस्टिक कॅरिबॅगचा वापर करणारे नागरिक दिसल्यास त्यांच्यावरही प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी