शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:13 IST

नाशिक : राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर राज्य शिक्षण मंडळानेही दहावीची ऑफलाइन परीक्षा रद्द करण्यात ...

नाशिक : राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर राज्य शिक्षण मंडळानेही दहावीची ऑफलाइन परीक्षा रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले असून, आता अंतर्गत मूल्यमापनाच्या साहाय्याने त्यांना उत्तीर्ण करण्यासाठी निकष ठरविण्याची कार्यपद्धती ठरविण्यात येत आहे. त्यामुळे यंदा लेखी परीक्षा होणार नसून, पर्यवेक्षकांना मानधन, विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अतिरिक्त साहित्य, भरारी पथकांचा खर्च, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचा मुद्रणखर्च असा खर्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला येणार नसल्याचे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षाच रद्द झाल्या आहेत तर दहावीच्या विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्कही शिक्षण मंडळ विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी नाशिकमधील पालकांकडून जोर धरू लागली आहे.

नाशिक विभागीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून सुमारे २ लाख १ हजार ६७५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसणार होते. प्रत्येक विद्यार्थ्याकडून राज्य शिक्षण मंडळाने ४१५ रुपये परीक्षा शुल्क घेतले असून, पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्याला ३९५ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून ४१५ रुपये याप्रमाणे मंडळाकडे जवळपास ८ कोटी ३६ लाख ९५ हजार १२५ रुपये शुल्क यंदा जमा झाल्याचा अंदाज आहे. तसेच पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे जवळपास ५० लाख रुपयांचे परीक्षा शुल्क मंडळाकडे जमा झाले आहे. मात्र, परीक्षा रद्द झाली असून आता अंतर्गत मूल्यमापनाच्या निकषावर निकाल लागणार असल्याने मंडळाकडून केल्या जाणाऱ्या नियोजनावर मानधन आणि मुद्रणासाठी लागणारा खर्च होणार नाही. त्यामुळे या रकमेचे शिक्षण मंडळ काय करणार, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात असून, ही जमा केलेली रक्कम विद्यार्थांना परत करावी, अशी मागणी नाशिक पॅरेंट्‌स असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे..

कोट-

विद्यार्थ्यांकडून आलेल्या शुल्काचे काय करणार आहे, ते विभागीय शिक्षण मंडळाने स्पष्ट करायला हवे? अन्यथा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातील आर्थिक परिस्थिती, परीक्षा रद्दचा निर्णय लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत करावे. नाशिक शहरातील काही शाळांनी नियम धाब्यावर बसवत मंडळाच्या शुल्काव्यतिरिक्त जास्त शुल्क घेतले आहे. त्यामुळे आता परीक्षा रद्द झाल्यानंतर परीक्षा शुल्क परत करण्याविषयी मंडळाने भूमिका स्पष्ट करावी.

- निलेश साळुंखे, अध्यक्ष, नाशिक पॅरेंट्स असोसिएशन