शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाचेच संदर्भ : तिढा वाढण्याची शक्यता लष्करी निर्बंध नसल्याच्या दाव्यावर आयुक्त ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:17 IST

लष्करी हद्दीभोवती बांधकामासाठी कोणतेही निर्बंध नसल्याने नव्या बांधकामांना परवानगी देण्याच्या पत्रावर महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण ठाम आहेत.

ठळक मुद्देविकासकांची कोंडी कायम न्यायालयीन लढाईचा मार्ग मोकळालष्कराकडे १५ प्रकरणे

नाशिक : लष्करी हद्दीभोवती बांधकामासाठी कोणतेही निर्बंध नसल्याने नव्या बांधकामांना परवानगी देण्याच्या पत्रावर महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण ठाम आहेत. त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे निर्बंध असेल तर महापालिकेने पाठविलेल्या बांधकाम प्रकरणांना अद्याप कमांडंट परवानगी देत नसल्याने विकासकांची कोंडी कायम आहे, तर या विषयावर न्यायालयीन लढाईचा मार्ग मोकळा असून, आता तेथेच उभय यंत्रणांनी भूमिका स्पष्ट करावी, असे मत याचिकाकर्ता शिवाजी सहाणे यांनी व्यक्तकेले आहे.लष्करी हद्दीच्या परिघात इमारत बांधकामांना निर्बंध घालणारे मार्गदर्शक परिपत्रक संरक्षण खात्याने २०११ मध्ये प्रसिद्ध केले. त्याविषयी अनेक खासदारांनी हरकती घेतल्याने पुन्हा स्पष्टीकरण देणारे पत्रक २०१६ मध्ये निर्गमित केले. त्यात ज्या शहराची नावे दिली त्यात नाशिकचा समावेश नाही. तथापि, महापालिकेने मात्र लष्करी हद्दीपासून पाचशे मीटर अंतराच्या परिघातील सर्व परवानग्या थांबवल्या आहेत. लष्कराकडे १५ प्रकरणे ना हरकत दाखल्यासाठी पाठविण्यात आली.ना हरकत दाखल्यासाठी पाठविली प्रकरणेलष्करी निर्बंध असल्याच्या २०११ च्या परिपत्रकानंतर महापालिकेने येथील बांधकाम विकासाच्या परवानग्याच दिलेल्या नाहीत. एकूण पंधरा प्रकरणे संबंधित अधिकाºयांकडे ना हरकत दाखल्यासाठी पाठविण्यात आलेली आहेत. त्यानुसार हरकतही घेण्यात येत नाही आणि ना हरकत दाखलाही दिला जात नाही.दोन यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभावलष्कर अधिकारी आणि महापालिका यांच्या पत्रापत्रीत विकासकांची अडचण झाली आहे. येथील विकासक अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, आता न्यायालयातच दोन्ही यंत्रणांनी बाजू मांडावी आणि स्पष्टीकरण द्यावे, अशी भूमिका घेतली आहे. दोन यंत्रणांच्या समन्वयाअभावी नागरिकांना अकारण अडवणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.