शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ कांद्याची ‘लाली’ फिकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:13 IST

सायखेडा : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला पुन्हा कवडीमोल दर मिळत असून, ...

सायखेडा : जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सतत घसरण सुरूच आहे. कांद्याला पुन्हा कवडीमोल दर मिळत असून, लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सर्व बाजार समित्यांमध्ये नवीन लाल कांदा दाखल झाला तरी उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. उन्हाळ कांद्याची अनेक शेतकरी साठवणूक करतात. साठवलेला कांदा अजूनही विक्रीसाठी आणला जात आहे.

निफाड तालुक्यातील लासलगाव, पिंपळगाव, सायखेडा या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याला अगदी कवडीमोल दर मिळत आहे. उन्हाळ कांदाच्या दरात सातत्याने घसरण सुरू आहे. कमी दराने व्यापारी कांदा खरेदी करतात. कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा साठवणूक आणि इतर खर्चदेखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकर्‍यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

निफाड तालुक्यात गोदावरी, कादवा नदीचे खोरे असल्याने उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात पाणी असते, शिवाय काळी कसदार जमीन, योग्य हवामान त्यामुळे या परिसरातील लोक उन्हाळ कांद्याची लागवड करत असतात. ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा संकटात यंदा कांदा पीक सापडले होते. त्यामुळे उत्पादन घटले. परिणामी खर्चदेखील वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. महागाई वाढल्याने कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. बियाणे, रोपे तयार करणे शेतीची मशागत करणे, खते देणे, औषधांची फवारणी करणे, खुरपणी करणे, कांदा कापणी करणे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो. शिवाय शेतकऱ्यांना चार महिने पाणी द्यावे लागते. इतकी मेहनत करून कांदा कवडीमोल दराने विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.

कोट....

कांदा निर्यात धोरण आणि शासनाच्या जाचक अटी, शर्ती, विविध बंधने यामुळे कांद्याच्या बाजारभावात चढउतार होत असतो. व्यापारी वर्गाच्या विक्रीच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले तर त्यात चार पैसे व्यापाऱ्यालासुद्धा मिळतात; पण वेगवेगळ्या कारणांमुळे बाजारभाव पडतात. त्याचा फटका शेतकऱ्यांना आणि व्यापारी या दोघांना बसतो.

- अनंत भुतडा,

कांदा व्यापारी, सायखेडा

कोट....

ढगाळ हवामान, बेमोसमी पाऊस, अतिथंडी अशा संकटात यंदा कांदा पीक सापडले होते. त्यामुळे उत्पादन घटले. एकरी कांदा अवघा ७० ते ८० क्विंटल निघाला. त्यामुळे किमान दोन हजार रुपये दर मिळूनदेखील कांदा परवडत नाही. किमान तीन हजार रुपये दर मिळाला तर दोन पैसे शिल्लक राहतील. मात्र अनेक दिवसांपासून कांद्याच्या दरात चढउतार होत आहे. आता तर लाल कांदा आल्याने उन्हाळ कांदा पुन्हा शेतकऱ्यांना रडवत आहे.

- उत्तम हाडपे, शेतकरी, म्हाळसाकोरे

फोटो- ०५ सायखेडा बाजार

सायखेडा बाजार समितीच्या आवारात झालेली कांदा आवक.