शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रेडीरेकनरच्या दरात यंदा नगण्य वाढ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 01:10 IST

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने यंदा नाशिकमधील जमिनींचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडीरेकनरच्या दरात नगण्य वाढ करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. शहराच्या काही भागात अगदी दीड ते दोन टक्के इतकीच दरवाढ होणार असून, त्या माध्यमातून यंदा विकासकांना तसेच नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देविकासकांना दिलासा काही भागात दीड ते दोन टक्के वृद्धी

संजय पाठक ।नाशिक : राज्य शासनाच्या वतीने यंदा नाशिकमधील जमिनींचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडीरेकनरच्या दरात नगण्य वाढ करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. शहराच्या काही भागात अगदी दीड ते दोन टक्के इतकीच दरवाढ होणार असून, त्या माध्यमातून यंदा विकासकांना तसेच नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.गेल्या तीन ते चार वर्षांत शहरातील बांधकाम व्यवसाय प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना राज्य शासनाने रेडीरेकनरच्या दरात केलेली वाढ ही अत्यंत अडचणीची ठरली होती. अनेक ठिकाणी पंधरा ते वीस टक्के दरवाढ झाल्याने ही दरवाढ व्यवहार्य नसल्याची ओरड झाली होती. अनेक ठिकाणी तर सरकारी दरापेक्षा बाजारातील दर कमी असल्याने व्यवहार कसे करावे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच रेडीरेकनरसोबत असलेल्या तळटीपेतील अनेक कलमेदेखील अडचणीची ठरली होती. त्यामुळे विकासकांना या तळटीपांना स्थगिती मिळावी यासाठी नाकदुऱ्या काढाव्या लागल्या होत्या. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी औरंगाबाद येथेच रेडीरेकनरच्या दरात आता वाढ केली जाणार नसल्याचे अथवा माफक दरवाढ असेल असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता येत्या १ एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहे.