शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

लाल कांदा दरात २५०० रूपयांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:51 IST

लासलगांव येथील बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याच्या दरात तब्बल २५०० रूपयांची घसरण झाली.

लासलगांव येथील बाजार समितीत शुक्रवारी लाल कांद्याच्या दरात तब्बल २५०० रूपयांची घसरण झाली. मंगळवारच्या तुलनेत तीन दिवसांतच चार हजार रूपयांची तर गुरूवारच्या तुलनेत २५०० रूपयांची घसरण होत ११५० वाहनातील १२२६७ क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला सकाळी किमान २२०० ते कमाल ७१५१ व सरासरी ५९०१ रूपये भावाने विक्री झाला. दरम्यान, सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत ९१ पिकअप आणि ७ ट्रॅक्टरमधून सुमारे ५६० क्विंटल कांदा विक्रीसाठी आला होता. कमीत कमी १ हजार, जास्तीत जास्त ९०४५ आणि सरासरी ७ हजार रूपये क्विंटल दराने कांदा विकला गेल्याची माहिती सभापती विनायक तांबे, सचिव विजय विखे यांनी दिली. लाल कांद्याच्या आवकेत काहीशी वाढ होताच कांद्याच्या दरात प्रति क्विंटल १ हजाराने घसरण झाल्याचे पाहायला मिळाले.बाजार समिती आवारात सोमवारी लाल कांद्याला उच्चांकी १०,५५५ रु पये प्रति क्विंटल दर मिळाला होता. दोडी उपबाजारात बुधवारी १३०५ क्विंटल कांद्याची गोण्यांमधून आवक झाली होती. यावेळी उच्चांकी ९१०० हजार रु पये तर सरासरी ४८०० रूपये क्विंटल दराने कांद्याची विक्र ी झाली. 

टॅग्स :Nashikनाशिक