शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

पुन्हा एकदा लाल दिव्याची हुलकावणी !

By admin | Updated: March 23, 2017 22:35 IST

ओझर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ेलाल दिवा हुकलेल्या मंदाकिनी बनकर यांना यंदाही आलेली संधी हुकली.

सुदर्शन सारडा  ओझरगेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ेलाल दिवा हुकलेल्या मंदाकिनी बनकर यांना यंदाही आलेली संधी हुकली. यामुळे पिंपळगावला लाल दिवा येण्याची संधी सलग दुसऱ्यांदा हुकली असली असल्याची चर्चा ओझर-पिंपळगाव परिसरात रंगली आहे. राजकारणामध्ये एखादा सामना खेळण्याची वेळ आली की गनिमी कावा, धूर्त खेळी, डोक्यावर बर्फ ठेवून समोरच्याचा काटा काढणे इत्यादि सर्व वाक्य सध्या कानी पडतात. परंतु नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत याचा शंभरटक्के प्रत्यय आला असल्याचे जाणकारांचे मत आहे. जिल्ह्याचा कौल हाती आला तेव्हा शिवसेना सर्वाधिक २५ जागा जिंकून प्रथम क्रमांकावर होती. त्यामुळे साहजिकच यंदा काहीसुद्धा झाले तरी जिल्हा परिषदेवर , भगवा फडकलाच पाहिजे असा चंग जिह्यातील सेनेच्या नेत्यांनी बांधला होता. याचाच प्रत्यय म्हणून सिन्नरच्या शीतल सांगळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. तर काँग्रेसच्या नयना गावित या उपाध्यक्ष झाल्या. निकालानंतरच्या काळात विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असल्याने दादा भुसे, अनिल कदम, राजाभाऊ वाजे हे मुंबईत होते.एकीकडे काही झालेल्या गुप्तबैठकांमध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीचे संकेत दिले असल्याचे ेसांगितले जात होते. परंतु दिलीप बनकर यांच्या राजकीय भविष्य उज्ज्वल होण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत पिंपळगावला लाल दिवा आणायचा होता. बनकर यांना लालदिवा मिळाला तर अनिल कदम यांना राजकीय कारकिर्दीत भविष्यात अडथळा निर्माण होणार होता. अशा परिस्थितीत बहुमतासाठी ३ सदस्यांची कमी भासत असताना शिवसेनेच्या काही शिलेदारांनी प्रयत्नांची शिकस्त केली. यात अनील कदम यांची भूमिका महत्त्वाची ठरली. पालकमंत्री गिरीश महाजन आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी जुळवाजुळव केल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दादा भुसे, अनिल कदम, राजाभाऊ वाजे, सुहास कांदे भाऊलाल तांबडे हे खरे बिनीचे सरदार ठरले असल्याचे मत व्यक्त होत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ेलाल दिवा हुकलेल्या मंदाकिनी बनकर यांना यंदाही आलेली संधी हुकली असेच काहीसे चित्र आहे. परंतु माकपा गटनेते रमेश बरफ यांनी घेतलेली तटस्थची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. दिलीप बनकर यांनी सर्व स्तरावरील नेत्यांची भेट घेतली, तर अजित पवार यांनी भाजपासोबत न जाता सेनेबरोबर जा असा अनुभवी सल्लादेखील त्यांना दिला असल्याचे बोलले जात आहे. एक दोन नेते वगळता राष्ट्रवादीच्या अंतर्गत विरोधालादेखील त्यांना सामोरं जावं लागल्याची चर्चा आहे.