शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ‘रेड कार्पेट’

By admin | Updated: May 27, 2017 00:23 IST

नाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनमध्ये येत्या रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनमध्ये येत्या रविवारी (दि. २८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी प्रशासनाची लगीनघाई सुरू झाली असून, रंगरंगोटीसह सभागृह दुरुस्तीवर भर दिला जात आहे. मुख्यमंत्र्यांना रेड कार्पेट अंथरून त्यांच्याकडून जास्तीत जास्त निधी पदरात पाडून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपासह प्रशासन उत्सुक आहे. येत्या रविवारी मुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर येत आहेत. भगूर, नाशिकरोड येथील नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर मुख्यमंत्री नाशिक महापालिका मुख्यालयात आयोजित बैठकीला हजर राहणार आहेत. महापालिकेत पहिल्यांदाच मुख्यमंत्री फडणवीस पाऊल ठेवणार असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे.मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी स्थायी समितीच्या सभागृहाची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे स्थायी समिती सभागृहाकडे जाणाऱ्या मार्गाची साफसफाई करण्याबरोबरच रंगरंगोटी केली जात आहे. याशिवाय, स्थायी समितीच्या सभागृहात संपूर्ण नवीन वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली असून, रंगकाम करत सभागृहाला चकाकी आणली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारापासून ते सभागृहापर्यंत रेड कार्पेट अंथरले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला कारंजाही सुरू करण्यात येऊन त्याची चाचणी घेण्याचे काम सुरू होते. बैठकीला प्रधान सचिवांसह आयुक्त, आमदार, खासदार, महापौर, उपमहापौर व सर्व पदाधिकारी, गटनेते उपस्थित राहणार असून, यावेळी महापालिकेमार्फत विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले जाणार आहे. महापालिकेला जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले जाणार आहे. त्यासाठीचे पक्षपातळीवर नियोजन केले जात आहे.