शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

शाही मार्गाचा होणार फेरविचार

By admin | Updated: August 3, 2014 01:58 IST

शाही मार्गाचा होणार फेरविचार

 नाशिक : कुंभमेळ्यातील पर्वणीच्या दिवशी अरुंद मार्गांवरून जाणाऱ्या साधू-महंतांच्या मिरवणुकीदरम्यान सरदार चौकात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमुळे आता ही गल्ली टाळण्यासाठी प्रशासनाने गणेशवाडीतून मिरवणूक नेण्याचा प्रस्ताव सुचवला आहे. त्यासंदर्भात आखाडा परिषद लवकरच निर्णय घेऊन जिल्हा प्रशासनाला कळविणार आहे. महंत ग्यानदास यांच्यासह अन्य महंतांनी शनिवारी याबाबत पाहणी केल्यानंतर तशी तयारी दर्शविली आहे.पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तयारी करीत आहे. गेल्या कुंभमेळ्यात म्हणजेच २००३ मध्ये पर्वणीच्या दिवशी साधू-महंतांच्या शाही मिरवणुकीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊन २९ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण शाही मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहेच, मुख्यत्वे काळाराम मंदिर ते सरदार चौक या भागाचेही रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु त्यास विरोधही होत आहे. त्यामुळे तपोवनातून महामार्ग ओलांडून काट्या मारुतीपर्यंत शाही मिरवणूक आल्यानंतर ती लक्ष्मण झुला पुलावरून आणि नाग चौकातून नेण्याऐवजी सरळ गणेशवाडीमार्गे गाडगे महाराज पुलाच्या खालून रामकुंड असा एक पर्याय सुचविण्यात आला आहे. सोमवारी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महंत ग्यानदास आणि अन्य महंतांनी जिल्हाधिकारी तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत लक्ष्मीनारायण मंदिरपासून काट्या मारुती आणि तेथून गणेशवाडीमार्गे रामसेतूपर्यंतच्या पर्यायी शाही मार्गाची पाहणी केली. त्याचबरोबर लक्ष्मण झुला पूल, नाग चौक, काळाराम मंदिर, सरदार चौक ते रामकुंड या मार्गाची पाहणी केली.या दोन्ही मार्गांची पाहणी केली आहे आता सर्व आखाड्यांशी चर्चा करून पर्यायी मार्ग वापरायचा किंवा नाही, याचा विचार केला जाईल असे महंत ग्यानदास यांनी सांगितले. येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्हा प्रशासनाला भूमिका कळविली जाईल, असे सांगतानाच त्यांनी कुंभमेळ्यासाठी यंत्रणेचे प्रारूप तयार झाले आहे, तसेच साधू-महंतही तयार करीत असून, त्याबाबत लवकरच प्रशासनाला माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. साधुग्रामसाठी लागणाऱ्या जागेबाबत शेतकऱ्यांचा विरोध आहे,यावर बोलताना त्यांनी कुंभमेळ्यासाठी गेल्या कुंभमेळ्यात जेवढी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती, त्यापैकी मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक होती. साधू-महंतांनी वाढत्या नागरीकरणामुळे या भागातील किमान साडेतीनशे एकर जागा राखीव ठेवावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता शासन- प्रशासन काय करीत आहे, हे माहीत नाही. परंतु गरज भासल्यासच शेतकऱ्यांची जमीन घेतली जाईल असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)