शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढल्यानंतरच भरती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:31 IST

मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढल्यानंतरच सरकारने ७२ हजार पदांची मेगाभरती करावी, नवीन आरक्षणनीती अवलंबावी, बोगस प्रमाणपत्राद्वारे आदिवासी झालेल्यांची हकालपट्टी करावी, यूपीएससीतील बॅक डोअर एन्ट्री थांबवावी यांसह विविध विषयांवरील आठ ठराव संदीप फाउंडेशन येथे आयोजित महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या राज्यस्तरीय चिंतन शिबिरात मंजूर करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष ई़ झेड़ खोब्रागडे यांनी रविवारी (दि़२९) शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत दिली़

नाशिक : मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढल्यानंतरच सरकारने ७२ हजार पदांची मेगाभरती करावी, नवीन आरक्षणनीती अवलंबावी, बोगस प्रमाणपत्राद्वारे आदिवासी झालेल्यांची हकालपट्टी करावी, यूपीएससीतील बॅक डोअर एन्ट्री थांबवावी यांसह विविध विषयांवरील आठ ठराव संदीप फाउंडेशन येथे आयोजित महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमच्या राज्यस्तरीय चिंतन शिबिरात मंजूर करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष ई़ झेड़ खोब्रागडे यांनी रविवारी (दि़२९) शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत दिली़  खोब्रागडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमतर्फे दोनदिवसीय राज्यस्तरीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात महाराष्ट्राच्या २२ जिल्ह्यांतील केंद्र व राज्य सरकारच्या सेवेतील व सेवानिवृत्त वर्ग एक व दोनच्या सुमारे दोनशे अधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन आपले विचार मांडले़ केंद्र व राज्य सरकार आपल्या साडेचार वर्षांतील कारकिर्दीचे सेलेबे्रशन करीत आहे, त्यांनी केलेल्या कामाची उपलब्धी आहेच मात्र ती कोणासाठी आहे हे पाहणेदेखील गरजेचे आहे़ सरकारने कमकुवत घटकांसाठी केलेले काम त्यांना जाणवले तरच लोकहितासाठी कटिबद्ध असल्याचे म्हणता येईल़ मात्र, सरकारच्या कामगिरीचे तटस्थपणे मूल्यमापन केल्यास सरकार अन्याय-अत्याचाराचे सेलेब्रेशन कसे करू शकते, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगितले़  फोरमच्या माध्यमातून मागासवर्गीय अधिकाºयांना संविधानानुसार मिळालेले अधिकार, आरक्षण, बढत तसेच महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांसंदर्भात लढा उभारला जाणार आहे़ मागास विद्यार्थ्यांना तीन वर्षांपासून शिष्यवृत्तीदेखील मिळालेली नाही, तसेच सर्वप्रथम राज्यातील एक लाख ३० हजार पदांचा मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढावा व त्यानंतरच मेगा भरती करावी, असे म्हणत या भरतीला विरोध केला़ यावेळी सहसचिव डॉ. बबन जोगदंड, कोषाध्यक्ष विलास सुटे, विभागीय अध्यक्ष रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते़फोरममधील ठरावमागासवर्गीय अधिकाºयांच्या आरक्षण, बढती, महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांसंदर्भात लढा उभारणाऱ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृहाच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार. सरकारने मागासवर्गीय समाजाच्या अनुशेषाची पदे अगोदर भरून मगच ७२ हजार जागा भराव्यात. एकूण ८५ टक्के लोकसंख्येला ५० टक्के आरक्षण आहे व उर्वरित १५ टक्के नागरिकांना ५० टक्के आरक्षण दिले जात आहे. शासनाने याचा विचार करूनच नवीन आरक्षण नीती अवलंबावी. आदिवासींच्या वनजमिनी ताब्यात द्याव्या. बोगस आदिवासी प्रमाणपत्र सादर करणाºयांची हकालपट्टी करावी. ‘यूपीएससी’तील सहसचिव पदावरील ‘बॅक डोअर एन्ट्री’ थांबवावी.

टॅग्स :Governmentसरकार