शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन लाख रुपयांचा परतावा

By admin | Updated: July 9, 2017 00:45 IST

नाशिक : दोन लाखांची रक्कम आॅनलाइन पद्धतीने काढून घेत फसवणूक झालेल्या इसमाची रक्कम सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा मिळाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : परदेशात झालेल्या खरेदीपोटी बचत खात्यातील दोन लाखांची रक्कम आॅनलाइन पद्धतीने काढून घेत फसवणूक झालेल्या इसमाची रक्कम सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा मिळाली आहे़ सायबर पोलिसांनी यापूर्वी एका वृद्ध महिलेची मोठी रक्कम बँकेतून वळती होण्याआधी रोखली होती़ पोलिसांच्या या सतर्कतेचे पोलीस आयुक्तांनी कौतुक केले आहे़कॉलेजरोडवरील पारिजातनगरमधील रहिवासी अनिल सुरेश बाविस्कर (व्हाइट व्हिलो अपार्टमेंट) यांचे महात्मानगरच्या आयसीआयसीआय बॅँकेत बचत खाते आहे़ अज्ञात इसमाने २० ते २३ जून या कालावधीत इंटरनेटच्या माध्यमातून आॅनलाइन पद्धतीने परदेशात विविध ठिकाणी खरेदी केली व त्या बिलापोटी बाविस्कर यांच्या बचत खात्यातील दोन लाख तीन हजार १५२ रु पये परस्पर वळते केले़ हा प्रकार लक्षात येताच त्यांनी २ जुलै रोजी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली होती़ पोलीस आयुक्तडॉ़रवींद्रकुमार सिंगल व सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला़ सायबर पोलीस ठाण्याच्या बँक सेलचे कर्मचारी कृष्णा राठोड व प्रदीप वाघ यांनी फिर्यादी बाविस्कर यांचे बचत खाते असलेल्या आयसीआयसीआय बँकेशी संपर्क साधून या फसवणुकीची माहिती दिली़ यानंतर बँकेने दखल घेत बाविस्कर यांची दोन लाख तीन हजार १५२ रुपयांची रक्कम पुन्हा त्याच्या खात्यावर वर्ग केली़