शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिज भरारी पथकाची कोटींची वसुली

By admin | Updated: January 22, 2017 00:17 IST

उद्दिष्ट गाठणे कठीण : ६४९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

नाशिक : वाळू माफियांकडून यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या धमक्या, पोलिसात दाखल झालेले खोट्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर यंदा गौण खनिजापोटी मार्चअखेर दिलेले ८९ कोटीचे उद्दिष्ट्य ओलांडणे महसूल खात्याला कठीण झाले असून, डिसेंबरअखेर वाळू माफियांवर करण्यात आलेल्या कारवाईपोटी सव्वाचार कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याची अनेक विकासकामे झाल्याने गौण खनिजाच्या रॉयल्टी पोटी गौण खनिज विभागाला भरपूर महसूल मिळाला होता, परंतु यंदा शासकीय कामे तसेच खासगी कामेही बंद झाल्याने त्या तुलनेत वाळू, खडी डबर, क्रेशर, माती याची मागणी कमी झाली. त्यामुळे रॉयल्टीवर त्याचा परिणाम झाला. जिल्ह्यात पंधरा वाळू ठिय्ये निश्चित करण्यात आलेले असले तरी, त्यातील फक्त पाच ठिय्यांचाच लिलाव होऊ शकला आहे व त्यापोटी प्रशासनाला चार कोटींच्या आसपास रक्कम मिळाली. अन्य ठिय्यांचा लिलाव होण्याविषयी साशंकता असून, आजवर चार वेळा जाहीर लिलाव काढूनही त्यास प्रतिसाद मिळालेला नाही.  दुसरीकडे पर जिल्ह्यातील वाळू चोरी छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात नाशकात दाखल होत असल्याचीही उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने भरारी पथके गठीत करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली असली तरी, त्यातून वाळू माफियांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवरच हल्ले करण्यापर्यंत मजल गाठली आहे. काहींनी पोलीस तसेच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रारी करून अधिकाऱ्यांना जेरीस आणण्याचा उद्योग सुरू केल्याने महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या भीतीपोटी दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली आहे. असे असतानाही डिसेंबरअखेर ६४९ बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून चार कोटी २९ लाख ७२ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी मार्चअखेर देण्यात आलेले ८९ कोटींचे उद्दिष्ट्यांपैकी जानेवारीपर्यंत ३८ कोटी इतकाच महसूल गौण खनिजापोटी वसूल झाला असून, येत्या दोन महिन्यांत उद्दिष्ट गाठणे कठीण असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)