शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज परतफेड न करणाऱ्या पतसंस्था संचालकांंकडून वसुली

By admin | Updated: September 16, 2016 23:45 IST

गुलाबराव पाटील : सहकारी संस्था आढावा बैठक

नाशिक : सहकारी संस्थांचे काम अधिक सक्षमपणे होण्यासाठी लवकरच संगणकीकरणावर भर देण्यात येणार असून, कर्ज परतफेड न करणाऱ्या पतसंस्थांच्या संचालकांच्या मालमत्तांवर बोजा चढवून वसुली करावी, असे निर्देश राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी सहकारी संस्थांच्या आढावा बैठकीत बोलताना दिले.नाशिक विभागातील सहकारी संस्थांच्या आढावा बैठकीत बोलताना पाटील यांनी सांगितले, बुडीत पतसंस्थांच्या संचालकांकडून वसुली करण्यासाठी एक कृती आराखडा तयार करून त्यानुसार तातडीने कार्यवाही करावी. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने अधिक सक्षम होण्यासाठी सभासद संख्या वाढविणे व पीककर्ज पुनर्गठणावर भर देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्याला कर्ज उपलब्ध करून देणे हा जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचा गाभा आहे. तसेच राष्ट्रीयकृत बॅँकांनीदेखील शेतकऱ्यांबाबत सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे.कर्ज वाटपासाठी राष्ट्रीयकृत बॅँका प्रतिसाद देत नसल्यास त्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात यावी, असेही पाटील यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार असल्याने शेती आणि शेतकरी समृद्ध करण्याचा प्रयत्न सहकार विभागामार्फत करण्यात येत आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाटील यांनी नाशिक विभागातील मंजूर भरलेली पदे व रिक्त पदांची माहिती घेतली. शेती कर्जवाटपातील बॅँकेच्या अडचणी व उपाययोजना यावरही त्यांनी चर्चा केली. तसेच तालुकानिहाय पीककर्ज मेळावे घेऊन सुलभ पीककर्ज वाटप योजनेची माहिती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव, एम. डी. पाटील यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखा परीक्षक, सहायक निबंधक उपस्थित होते.