शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

पाच महिन्यांत ४५ कोटींची वसुलीं

By admin | Updated: September 9, 2016 02:09 IST

महापालिका : घरपट्टी- पाणीपट्टी वसुली संथगतीने

नाशिक : गतवर्षी पाच महिन्यांतच महापालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीतून ५० कोटी रुपयांचा आकडा पार केला होता. यंदा मात्र वसुली संथगतीने सुरू असून, एप्रिल ते आॅगस्ट २०१६ या कालावधीत ४५ कोटी रुपये महसूल जमा होऊ शकला आहे. एलबीटीसह अन्य स्त्रोतांद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने महापालिकेला घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीकडे अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.मागील वर्षी मनपाने एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी घरपट्टी बिलावर सवलत योजना राबविली होती. २ ते ५ टक्क्यांपर्यंत सूट दिल्याने मनपाला आर्थिक वर्षाच्या प्रारंभालाच तीन महिन्यांत सुमारे ३६ कोटी रुपये केवळ घरपट्टीच्या माध्यमातून प्राप्त झाले होते. यंदाही घरपट्टीसाठी सवलत योजना राबविण्यात आली, परंतु गतवर्षाच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला. एप्रिल ते ७ सप्टेंबर २०१६ या पाच महिन्यांच्या कालावधीत ३७ कोटी ३१ लाख रुपये घरपट्टी वसूल झाली आहे. १ लाख ७४ हजार १४० मिळकतधारकांनी घरपट्टीची बिले भरली आहेत. मुदतीत बिले भरणाऱ्यांना मनपाने एकूण ५२ लाख रुपयांची सूट देण्यात आली आहे. पाच महिन्यांत नाशिक पश्चिम विभागाने सर्वाधिक सात कोटी १८ लाख रुपयांची वसुली केली आहे, तर पंचवटी विभाग वसुलीत पिछाडीवर आहे. मागील वर्षी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या कालावधीतच ३९ कोटी ६४ लाख रुपयांची घरपट्टी, तर आठ कोटी ४० लाख रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली होती. आॅगस्ट २०१५ अखेर वसुलीचा आकडा ५० कोटींच्यावर जाऊन पोहोचला होता. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत पाणीपट्टी सात कोटी ९६ लाख रुपये वसूल झाली. गत वर्षाच्या तुलनेत पाच कोटीने वसुलीत घट झालेली आहे. (प्रतिनिधी)