शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

महसूल खात्यापुढे दररोज दोन कोटी वसुलीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 01:05 IST

राज्य सरकारकडून दरवर्षी दिले जाणारे महसूल खात्याचे विविध कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी येत्या २१ दिवसांसाठी महसूल खात्याला दररोज दोन कोटी रुपयांची वसुली करावी लागणार आहे. बुधवारी जिल्हाधिकाºयांनी यासंदर्भात महसूल अधिकाºयांची आढावा बैठक घेऊन महसूल वसुलीच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत.

नाशिक : राज्य सरकारकडून दरवर्षी दिले जाणारे महसूल खात्याचे विविध कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी येत्या २१ दिवसांसाठी महसूल खात्याला दररोज दोन कोटी रुपयांची वसुली करावी लागणार आहे. बुधवारी जिल्हाधिकाºयांनी यासंदर्भात महसूल अधिकाºयांची आढावा बैठक घेऊन महसूल वसुलीच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत.  यंदा राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला मार्च अखेरीस २०५ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले असून, त्यानुसार प्रत्येक तालुक्यातून गोळा करावयाच्या विविध करांच्या रकमा वाटून देण्यात आल्या आहेत. फेब्रुवारीअखेर १४५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून, उर्वरित ६० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मार्च महिन्याचे शासकीय सुटीचे दिवस वगळून फक्त २१ दिवसांत वसुलीचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे दिवसाकाठी दोन ते अडीच कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट बुधवारच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. गेल्या वर्षी राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टापेक्षाही अधिक वसुली जिल्हा प्रशासनाने केली होती. यंदा मात्र वसुलीत अनेक अडचणी सरकारनेच उभ्या केल्या आहेत. देशात सर्वत्र एकच करप्रणाली म्हणजे जीएसटी लागू केल्यामुळे महसूल खात्यामार्फत जमा केला जाणारा करमणूक कर आता महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतीमार्फत वसूल केला जात असून, तसाच प्रकार रोहयो व शिक्षण कराच्या वसुलीबाबत झाला आहे. जिल्हा प्रशासनाला या करातून दरवर्षी कोट्यवधी रुपये महसूल मिळत होता. तसेच गौणखनिजाच्या परवान्याबाबतही कायदेशीर तिढा उभा राहिल्यामुळे गौणखनिजातूनही उत्पन्न मिळेनासे झाले आहे.शासनाला परिस्थिती अवगतकर वसुलीबाबत शासनाच्या धोरणात दरवर्षी होणाºया बदलामुळे महसूल वसुलीत येणाºया अडचणी व कर वसुलीतील घट होण्यामागच्या कारणांची मीमांसा करणारे पत्र जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला पाठविले आहे. शासनाने यंदा जिल्हा प्रशासनाला वसुलीचे उद्दिष्ट वाढवून दिल्यानंतर करमणूक कर, रोहयो कर, शिक्षण कर कमी झाल्याची बाब राज्य सरकारला कळविण्यात आली आहे.दुहेरी दंडाची कारवाई सुरूवाळू लिलावावर न्यायालयाची बंदी व अवैध वाहतूक करणाºयांवर दुहेरी दंडाची  कारवाई सुरू करण्यात आल्यामुळे वाळू वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी त्यातून दरवर्षी मिळणाºया कोट्यवधीच्या रकमेपासून महसूल खात्याला वंचित राहावे लागले आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय