शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वसुली जोरात : तापी, सारंगखेड्याची वाळू नाशकात वाळू तस्करांचा गाड्या पकडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:52 IST

नाशिक : सारंगखेडा, तापी नदीतून वाळू उपसा करून तस्करांकडून त्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असून, नाशिक शहरात आणल्या जात असलेल्या वाळूच्या गाड्या महसूल विभागाच्या भरारी पथकाने पाठलाग करून पकडल्या आहेत.

ठळक मुद्देगौणखनिजाच्या चोरीविरुद्ध मोहीमट्रक महामार्गावर अडविण्यात आले

नाशिक : उच्च न्यायालयाने राज्यातील वाळू लिलावाला स्थगिती दिलेली असतानाही सारंगखेडा, तापी नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून तस्करांकडून त्याची बेकायदेशीर वाहतूक केली जात असून, नाशिक शहरात चोरी, छुप्या पद्धतीने आणल्या जात असलेल्या वाळूच्या गाड्या महसूल विभागाच्या भरारी पथकाने पाठलाग करून पकडल्या आहेत.नाशिक जिल्ह्यातील २४ वाळूच्या ठिय्यांच्या लिलावाची प्रक्रिया गौणखनिज विभागाने सुरू केली असताना, दोन वेळा जाहीर लिलावासाठी जाहिरात देऊनही वाळू ठेकेदारांनी लिलावाकडे पाठ फिरविली. प्रशासनाने तिसºयांदा फेरलिलावाची तयारी करताना वाळू लिलावासाठी अपसेट रक्कम कमी करण्याची तयारी चालविली असतानाच गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाने वाळू लिलावांना स्थगिती दिली आहे. असे असतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर चोरी, छुप्या पद्धतीने वाळूची वाहतूक केली जात आहे. यंदा वाळू लिलावाला स्थगिती मिळाल्यामुळे प्रशासनाला वाळू लिलावातून मिळणाºया रकमेला मुकावे लागणार असल्याने त्यावर तोडगा म्हणून महसूल विभागाने गौणखनिजाच्या चोरीविरुद्ध मोहीम उघडून त्यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. साधारणत: रात्री व पहाटेच्या वेळी नाशिक शहरात वाळू तस्करांकडून वाळूची वाहतूक केली जात असल्याने याच काळात महत्त्वाच्या ठिकाणांवर भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.रविवारी शासकीय सुटीच्या दिवशी महसूलची पथके सुटीवर असल्याचे समजून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक सुरू असल्याने अशा जवळपास चार मोठे ट्रक मुंबई-आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी अडविण्यात आले. चालकांकडे वाळू वाहतुकीचा परवाना तसेच रॉयल्टी भरल्याची पावती मागितली असता ती नसल्याने सदर वाळू चोरीची असल्याच्या संशयावरून ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत.लाखोंचा महसूल; पाचपट दंड आकारणीताब्यात घेतलेल्या ट्रकमध्ये सारंगखेडा, तापी नदीतील वाळू असून, या वाळूला नाशिक व मुंबईत चांगली मागणी असल्यामुळे साधारणत: पाच हजार रुपये ब्रास या दराने वाळूची विक्री केली जात आहे. नाशिक तहसील कार्यालयाने वाळू तस्करांविरुद्ध मोहीम उघडली असून, वाळूच्या दराच्या पाचपट दंड आकारणीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यातून लाखो रुपये महसूल गोळा झाला आहे.