देवळाली कॅम्प : गेल्या मे महिन्यात लष्कराने दारणा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जप्त केलेल्या मोटारी परत केल्या आहेत. छावणी परिषदेचे उपाध्यक्ष बाबुराव मोजाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकऱ्यांनी ब्रिगेडिअर प्रदीप कौल यांची भेट घेऊन पाणीटंचाईच्या काळात लष्काराने शेतकऱ्यांचे वीजपंप जप्त केले होते. सदर पंप परत मिळावे, यासाठी मोजाड यांनी निवेदन दिले होते. त्यानुसार कौल व मोजाड यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासाठी स्कूल आॅफ आर्टिलरीचे मेजर जनरल बेदी यांची भेट घेत लहवित, विंंचुरी, राहुरी, पांढुर्ली, भगूर, आगासखिंड या गावांतील शेतकऱ्यांच्या मोटारी परत करण्याबाबत विनंती केली होती. यानुसार लष्कराच्या वतीने शेतकऱ्यांच्या मोटारी परत करण्यात आल्या आहेत. यावेळी मोजाड यांच्यासह बाळासाहेब पानसरे, रुंजा मुठाळ, बुधाजी पानसरे, पोपट सांगळे, सयाजी भोर, संतोष मेढे, अर्जुन काळे आदि उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांच्या मोटारी जप्त केल्या आहेत त्यांनी संपर्क साधून मोटारी परत घेऊन जाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे .
जप्त केलेले वीजपंप परत
By admin | Updated: July 24, 2016 23:35 IST