शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ३६ तासात विक्रमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:32 IST

नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेल्या ३६ तासांत जिल्ह्यात ५३३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऐन सणासुदीत पावसाच्या संततधारेमुळे जनजीवनावरही परिणाम झाला असून, शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. बुधवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती.

नाशिक : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, गेल्या ३६ तासांत जिल्ह्यात ५३३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. ऐन सणासुदीत पावसाच्या संततधारेमुळे जनजीवनावरही परिणाम झाला असून, शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून पावसाने आपली हजेरी कायम ठेवली आहे. बुधवारीही दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. नाशिक शहरातील अनेक भागात सकाळपासूनच सुरू असलेल्या पावसाने दुपारी काही वेळ विश्रांती घेतली, मात्र दुपारी चार वाजेनंतर आकाशात काळे ढग दाटून जोरदार पाऊस सुरू झाला सुमारे पाऊण तास कोसळलेल्या पावसाने रस्ते जलमय होऊन अनेक ठिकाणी घरांमध्ये, तळघरांत पाणी साचले. त्यामुळे रस्ता वाहतूक काही प्रमाणात मंदावली होती. दिवसभरात नाशिक शहरात २० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. जिल्ह्णातील ग्रामीण भागात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ४२७ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद करण्यात आली असून, फक्त नांदगाव तालुक्यात पाऊस झाला नाही. सर्वाधिक पावसाची नोंद सुरगाणा व त्यानंतर कळवण तालुक्यात करण्यात आली आहे. बुधवारीही पावसाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्णात १०६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, निफाड, सिन्नर, देवळा, नांदगाव, कळवण, सुरगाणा या तालुक्यात पाऊस झाला.पावसाच्या संततधारेने शेतकरी हवालदिल झाले असून, बाजारात कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने शेतकºयांनी साठवलेला कांदा बाजारात आणण्याची तयारी चालविली असता पावसामुळे कांदा ओला होऊन सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर द्राक्षबागांच्या छाटणीवरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. बागांमध्ये पाणी साठू लागल्याने त्यामुळे पालवी फुटण्यास विलंब होण्याचा अंदाज आहे. याशिवाय कापणीवर आलेले सोयाबीन, तूर, भुईमूग, मका व बाजरी पिकानांही फटका बसला आहे. असाच पाऊस आणखी काही दिवस सुरू राहिल्यास परिस्थिती बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यंदा १ जून ते ११ आॅक्टोबरदरम्यान जिल्ह्यात १२५ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. मालेगाव तालुकावगळता चौदा तालुक्यात पावसाने शंभरी ओलांडली असून, नाशिक तालुक्यात १९० टक्के इतका सर्वाधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात १०९ टक्के पाऊस नोंदविला गेला होता.